आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्‍नाच्‍या 9 दिवस आधी तिने लिहील्‍या 3 सुसाइड नोट, वाचा का केली आत्‍महत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - हिमाचल प्रदेशातील पीर सलूहीमधील टिक्कर गावातील ही घटना आहे. लग्‍नाला 10 दिवस बाकी असताना येथील युवतीने आत्‍महत्‍या केली. तिच्‍या होणा-या नव-याचे दुस-या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्‍यामुळे त्‍याने लग्‍नाला दिलेला नकार या युवतीला सहन झाला नाही नि तिने थेट टोकाचे पाऊल उचलले.
सुनीता सिंह असे आत्‍महत्‍या केलेल्‍या मुलीचे नाव आहे. कांगू येथील दिनेशकुमार याच्‍याशी तिचे लग्‍न जुळले होत. येणा-या 29 ऑक्‍टोबरला ते लग्‍नबंधनात अडकणार होते. पण लग्‍नाला अवघे दहा दिवस शिल्‍लक असताना मर्चंट नेव्‍हीत नोकरीला असलेल्‍या दिनेशकुमारने सुनीताला सांगितले की, माझे दुस-या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि मला तिच्‍याशी लग्‍न करायचे आहे. या घटनेने सुनीताचा चांगलाच धक्‍का बसला घरी आई-वडिलांना सांगितले, तर त्‍यांना काय वाटेल, समाजात लोक काय म्‍हणतील या विचाराने ती खचून गेली नि तीने आत्‍महत्येचा पर्याय निवडला.
विष घेऊन आत्‍महत्‍या
लग्‍नाला 9 दिवस बाकी असताना या युवतीने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. रात्री 12.30 च्‍या दरम्‍यान तिची प्रकृती अत्‍यंत गंभीर झाली. त्‍यावरून कुटुंबियांच्‍या लग्‍नात आले की, सुनीताने विष घेतले. तिला तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍येही हलवण्‍यात आले. मात्र ती वाचू शकली नाही. आत्‍महत्‍येपूर्वी तिने लिहीलेल्‍या तीन सुसाइड नोट आढळल्‍या आहेत. यावरून हा सर्व प्रकार समोर आला.
यांच्‍यासाठी लिहीले वेगवेगळे तीन सुसाइड नोट
जोडीदार दिनेश, आई-वडिल व भाऊ आणि पोलिस अशा तिघांसाठी सुनीताने सुसाइड नोट लिहीले आहे. तिने लिहीले की, तुम्‍हाला जर, लग्‍न करायचे नव्‍हते तर, मला दोन महिन्‍याआधी तुम्‍ही सांगायला हवे होते. मात्र, आता फार उशीर झाला आहे. आम्‍ही लग्‍नाही सर्व तयारी केली आहे. माझे आई.वडिल आनंदी आहेत. मला चांगले स्‍थळ मिळाले यांचे त्‍यांना संबंध आहे. पण अचानक तुम्‍ही तुमचे दुसरे प्रेमप्रकरण समोर आल्‍याने मी काय उत्‍तर देऊ असे तिने लिहीले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लि करून वाचा, सुनीताने काय लिहीले सुसाइड नोटमध्‍ये..