आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन अतिरेकी ठार, सुरक्षा दलाच्या दाेन जवानांना वीरमरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. इतर २ ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. या धुमश्चक्रीत दोन जवानही शहीद झाले.


मंगळवारी राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीरचे एसओजी व केंद्रीय राखीव दलाने कुपवाडा जिल्ह्याच्या कुमार मोहल्ला, मागम, अनानवन व हजबुर्ज भागात शोधमोहीम राबवली. या भागातील सर्व मार्ग सील केले आहेत. या भागात सुरक्षा दलेे तपासणी करत असताना अतिरेक्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांच्या गोळीबारात तोयबाचे तीन अतिरेकी ठार झाले

बातम्या आणखी आहेत...