आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळीवार्‍यासह मुसळधार पावसाने बिहारला झोडपले, 33 बळी; हजारो बेघर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पुर्णिया: वादळीवार्‍यासह पावसामुळे महिलेचा मृत्यू, मृतदेहाजवळ बसून आक्रोश करताना नातेवाइक)
पाटणा- बिहारमधील पुर्णिया, मधेपुरा आणि कटिहार जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळीवार्‍यासह बेमोसमी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. पावसामुळे 33 जणांचा मृत्यू झाला असून हजारों लोक बेघर झाले आहे. पूर्णिया जिल्ह्यात 25, मधेपुरामध्ये 7 तर कटिहारमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तिन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रीपासून वीज गायब आहे. वादळामुळे मोबाइल टॉवरचेही मोठे नुकसान झाल्याने मोबाइल सेवा ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमारांनी मृतांच्या वारसांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नीतीश कुमार लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
100 कोटींचे नुकसान...
वादळीवार्‍यासह मुसळधार पावसामुळे तिन्ही जिल्ह्यात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 15 हजारांहुन जास्त घरे कोसळली असून पाच हजार वृक्ष उन्मळून पडले आहे. तसेच तीन हजारांपेक्षा जास्त प्राणी दगावले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनतर्फे नुकसानाचे पंचनामे केले जात असून नुकसानग्रस्ताना तातडीने मदत दिली जात आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नुकसानाची छायाचित्रे....