आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदूरमध्ये पिंजऱ्यातून बाहेर आली वाघिण, कुणी गाठली कार तर कुणी टॉयलेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने येथील प्राणिसंग्रहालयात मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. या दरम्यान एका वाघिण अचानक उंच उडी मारुन पिंजऱ्यातून बाहेर आली. त्यानंतर लोकांमध्ये एकच कल्लोळ उडाला. कुणी कारमध्ये, कुणी गेस्ट हाऊसमध्ये तर कुणी चक्क टॉयलेटमध्ये लपले. सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी वाघिणीला बेशुद्ध करुन पु्न्हा पिंजऱ्यात कोंडले.
चौथ्या प्रयत्नात पिंजऱ्यावरुन मारली उडी
- जमुना असे या वाघिणीचे नाव आहे. ती 15 महिन्यांची आहे. या प्राणिसंग्रहालयातील ती एक आकर्षण आहे.
- तिच्या पिंजऱ्याजवळ काही लहान मुले खेळत होते. यावेळी एका मुलाजवळच्या फुगा जमुनाच्या पिंजऱ्यात गेला.
- जमुना फुग्यासोबत खेळू लागली. या दरम्यान फुगा जोरात फुटला. ती प्रचंड घाबरली. ती पिंजऱ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागली.
- जमुना वाघिण आणि लकी वाघाच्या पिंजऱ्यादरम्यान 14 फुटांची सुरक्षा भींत आहे. त्यावर सात फुटांची जाळी लावण्यात आली आहे.
- यातील एका भागाची जाळी तुटलेली आहे. जमुनाने त्यातून निघण्याचा तिनदा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी झाली.
- चौथ्या प्रयत्नात मात्र तिला यश मिळाले. ती पिंजऱ्यातून बाहेर आली. तिला बघून लोकांची एकच तारांबळ उडाली.
- तिला बघून लोक सौरावैरा पळू लागले. जागा मिळेल तेथे लपू लागले. याची माहिती प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना मिळाली.
- 18 कमचाऱ्यांच्या टीमने सुमारे तासभर प्रयत्न करुन वाघिणला ट्रॅक्युलायझरच्या मदतीने बेशुद्ध केले.
पुढील स्लाईडवर बघा, पिंजऱ्यातून वाहिण बाहेर आल्यावर लोकांची भीतीने गाळण उडाली....
बातम्या आणखी आहेत...