आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या एक दिवस आधी जगातील Most Clicked वाघीण ‘मछली\'चा मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सवाई माधोपूर/जयपूर- जगभरात मछली नावाने प्रसिद्ध असेलेल्‍या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील टी-16 या वाघिणीचा मृत्‍यू झाला आहे. मछली वाघीण पाच दिवसांपासून आजारी होती. आजारपणात तिने काहीही खाल्‍ले नव्‍हते. या वाघिणीच्‍या चेह-यावर मासोळीसारखा आकार होता म्‍हणून तिला मछली हे नाव पडले. जगभरातील अनेक छायाचित्रकारांनी या वाघिणीचे फोटो काढले आहेत. गेल्‍या दहा वर्षात या वाघिणीला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यटकांच्‍या माध्‍यमातून अभयारण्‍याला 67 कोटी रुपयांची कमाई झाली.
पाण्‍यातील मगरीसमोर हत्‍तीसारखे भलेमोठे प्राणीही गुडघे टेकवतात. मात्र, राजस्‍थानमधील सवाई मोधापूर जिल्‍ह्यात असलेल्‍या रणथंभोर व्‍याघ्रप्रकल्‍पातील मछली नावाची (टी-16) प्रसिद्ध वाघीण मगरीसोबतही भिडली होती. त्‍याचे फोटो आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात शेवटी दाखवणार आहोत. 2004 मध्‍ये रणथंभोर व्‍याघ्रप्रकल्‍पात भयंकर दुष्‍काळ पडला होता. येथील प्राण्‍यांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची मोठी समस्‍या निर्माण झाली होती. वनविभागाच्‍या वतीने परिसरात पाण्‍याची सोय करण्‍यात आली होती. पाणवठे सुकल्‍यामुळे शेकडो मगरी बाहेर येऊन दाट झाडांमध्‍ये लपत असत. यातील मगरीची मछलीने शिकार केली होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मछली वाघिणीचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...