आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्दल घडवू; जागा, वेळ आम्हीच ठरवू, पाकला Indian Army चा सज्जड दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/नवी दिल्ली - काश्मिरातील उरीमध्ये झालेल्या आजवरच्या सर्वांत मोठ्या हल्ल्याचे उत्तर काय असावे यावर सरकार पातळीवर दिवसभर काथ्याकूट झाला. पंतप्रधानांसह वेगवेळ्या स्तरावर रणनीतीबाबत मंथन झाले आणि सायंकाळी लष्कराने पाकिस्तानला सज्जड दम भरला. पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली जाईल, पण त्यासाठी वेळ आणि स्थळ आम्ही ठरवू, अशा शब्दांत डीजीएमओ ले. जनरल रणबीर सिंह यांनी ठणकावले. त्यानंतर लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्यासाठी गेले. सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली.

तत्पूर्वी मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात पाकिस्तानला जगात वेगळे पाडून दहशतवादी देश म्हणून जाहीर करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. राजनैतिक व आर्थिक आघाडीवरही पाकला आक्रमकता दाखवण्यावर चर्चा झाली. त्यानुसार भारताने अमेरिका, रशियाशी संपर्क केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. रशियाने पाकव्याप्त काश्मिरातील आपला लष्करी सराव रद्द केला. एमआय-३५ हेलिकाॅप्टर देण्यात हात आखडता घेतला. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रांत हल्ल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडतील. तथापि, उरीहून पाकिस्तानला जाणारी बस सोमवारी पूर्वीप्रमाणेच सुरू राहिली.
पुढे वाचा...
> सरकारपातळीवर दिवसभर पाकला घेरण्याची रणनीती
> महाराष्ट्राच्या चार जवानांना वीरमरण
> पाकची घाबरगुंडी, सुरक्षेचा आढावा
> कुळमेथे यांचे निधन शहिदांचा आकडा १८
बातम्या आणखी आहेत...