आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृपा करून टिपू जयंतीला मला निमंत्रण देऊ नका ! केंद्रीय मंत्री हेगडे यांची विनंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौशल्य विकास राज्यमंत्री हेगडे... - Divya Marathi
कौशल्य विकास राज्यमंत्री हेगडे...
बंगळुरू- टिपू सुल्तानची जयंती साजरी करण्याची गेल्या दोन वर्षांची वादग्रस्त परंपरा यंदाही कर्नाटकात सुरू राहणार असल्याचे दिसून येते. कारण त्यावर आतापासूनच वादंगाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून कृपा करून मला जयंती कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवू नका. हा कार्यक्रम म्हणजे ‘लाजिरवाणा’ प्रकार आहे, असे पत्रात नमूद केले आहे.  

कर्नाटक सरकारने मला निमंत्रण देण्याचा प्रयत्न करू नये. म्हैसूरच्या १८ व्या शतकातील अत्यंत क्रूर,अत्याचारी राजाचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका हेगडे यांनी केली. हेगडे यांनी शुक्रवारी याबाबत ट्विटदेखील केले होते.  हेगडे यांच्या पत्रावर मुख्यमंत्री सिद्धरमय्या म्हणाले, ते सरकारचा एक घटक आहेत. त्यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास नको होते. खरे तर निमंत्रणपत्रिका आम्ही केंद्रातील सर्व मंत्री व नेत्यांना पाठवणार आहोत. ती स्वीकारायची किंवा नाही, हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.  
 
२०१५ पासून मोठ्या पातळीवर जयंती
२०१५ मध्ये हेगडे यांनी राज्य सरकारवर जयंती साजरी केल्याबद्दल टीका केली होती. कर्नाटकच्या सीमेवरील कोडागू प्रदेशातील समुदायाची टिपू सुल्तान जयंती करण्यावरून राज्य सरकारवर तीव्र नाराजी आहे. टिपू सुल्तान कन्नड भाषिक तसेच हिंदूविरोधी होता, असा दावा करण्यात येतो.  विरोध होत असतानाही कर्नाटक सरकार २०१५ पासून वाजत-गाजत जयंती साजरी करण्याची परंपरा सुरूच ठेवली आहे. 
 
ब्रिटिशांच्या विरोधात चार लढाया  
टिपू सुल्तानने ब्रिटिशांच्या विरोधात चार लढाया लढल्या. वसाहतवादी सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून त्यांनी काम केले, अशा शब्दांत सिद्धरमय्या यांनी आपले मत व्यक्त केले.  

१० नोव्हेंबर रोजी जयंती  
कर्नाटक सरकार १० नोव्हेंबर रोजी टिपू जयंती साजरी करते. दोन वर्षांपूर्वी जयंती आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्यावर भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार टीका केली होती. काँग्रेसने आपल्या कृतीतून अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपसह संघाने केला होता. 
बातम्या आणखी आहेत...