आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tirumala Tirupati Devasthanams (TTD) Opens Demat Account On Balaji\'s Name To Enable Devotees To Donate Shares

तिरुपती बालाजीला सोने नव्हे शेअर्सही दान करता येणार, उघडले Demat Account

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- देशातील सर्वाधिक श्रीमंतदेवसंस्थानमानले जाणारे तिरुमला येथील व्यंकटेश्वराला अर्थात तिरुपती बालाजीला आता शेअर्स देखील दान करता येणार आहेत.

तिरुमला तिरुपती देवस्थानने सोमवारी (3 ऑगस्ट) डीमेट अकाउंट (Demat Account) उघडले आहे. या नव्या सुविधेमुळे भाविकांना रोख रक्कम, सोने तसेच शेअर्स देखील दान करता येणार आहे. शेअर्स रुपात दान घेणारे हे जगातील पहिलेच देवसंस्थान असावे.
टीटीडीकडे सुपूर्द केले दस्ताऐवज...
सेंट्रल डिपोजिटरीज सर्व्हिस लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी सोमवारी तिरुमला तिरूपती देवसंस्थान अर्थात टीटीडीचे कार्यकारी अधिकारी डी. संभाशिव यांची भेट घेऊन डीमेट अकाउंटचे दस्ताऐवज सुपूर्द केले. टीटीडीचा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1601010000384828 हा खाते क्रमांक आहे. देश-विदेशातील भाविकांना दान करण्यासाठी नवी सुविधा सुरु करण्‍यात आली आहे. याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा टीटीडीने व्यक्त केली आहे.
याआधी तिरूमला येथे ऑनलाइन आणि फॉरेन करन्सी दान करण्याची सुविधा सुरु करण्‍यात आली होती. या‍सोबत दान देण्याची पारंपरिक पद्धत देखील सुरु आहे. सोमवारी एका कापड कंपनीने टीटीडीला 6.5 लाख रुपयांचे कपडे दान केले होते.