आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती मंदिराने बँकेत जमा केले 1800 किलो सोने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुपती - प्रसिद्ध तिरुपती मंदिरात भाविकांनी व्यंकटेशचरणी अर्पण केलेले 1800 किलो सोने शनिवारी देवस्थान अधिकार्‍यांनी भारतीय स्टेट बँकेत जमा केले. मंदिराकडून विविध बँकांत आतापर्यंत तब्बल 6,000 किलो सोने जमा करण्यात आलेले आहे.

मंदिराचे व्यवस्थापन पाहणार्‍या तिरुमला तिरुपती देवस्थानम संस्थेचे कार्याधिकारी एम.जी.गोपाल यांनी मंदिर मुख्यालयात हे सोने बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याकडे सोपवले. एसबीआयच्या गोल्ड स्कीमअंतर्गत वार्षिक एक टक्का व्याजाने पाच वर्षांसाठी हे सोने जमा करण्यात आले आहे. सोन्याचे एक टक्का व्याज म्हणजेच दरवर्षी सुमारे 12 किलो सोने असते. पाच वर्षांत मंदिराला व्याजापोटी 60 किलो सोने मिळेल. सन 2010 पासून मंदिर व्यवस्थापन डिपॉझिटवरील व्याजाची रक्कमही सोन्यातच गुंतवत आहे. हे सोने बँक स्वखर्चाने व विमा कवचासह मुंबईतील टंकसाळीत नेईल. तेथे ते वितळवणे व शुद्धिकरण केल्यानंतर 0.995 शुद्धता रुपातील सोनेच डिपॉझिट म्हणून मानले जाईल.

पुढील स्लाइडमध्ये, दोन वर्षांपासून साठवलेले सोने