आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती मंदिरात 2 महिन्यांत आल्या 4 कोटींच्या जुन्या नोटा, ट्रस्ट संभ्रमावस्थेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुपती मंदिरातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी येथे 1000 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम देणगी स्वरुपात मिळते. (फाइल) - Divya Marathi
तिरुपती मंदिरातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी येथे 1000 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम देणगी स्वरुपात मिळते. (फाइल)
तिरुपती- तिरुपति मंदिराच्या हुंडीत गेल्या दोन महिन्यांमध्ये 4 कोटी रुपये जुन्या बंद झालेल्या 500-1000 च्या नोटांच्या स्वरुपात आले आहे. मंदिर व्यवस्थापनासमोर विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. ही अडचण पाहता, मंदिर व्यवस्थापनाने सरकार आणि आरबीआयला लेटर लिहिले आहे. 

ठरलेल्या तारखेनंतर आल्या नोटा.. 
- हुंडीमध्ये आलेले हे दान बंद झालेल्या नोटा खर्च करण्याच्या किंवा बदलण्याच्या तारखेनंतर म्हणजे 30 डिसेंबरनंतर आले आहे. 
- तिरुमाला तिरुपती देवस्थानम्सचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डी. संबाशिवा राव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 
- त्यांनी सांगितले की, मंदिराकडून सरकार आणि आरबीआयला पत्र लिहून या नोटांचे काय करायचे अशी विचारणा करण्यात आली आहे. 
- सरकारने 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगल्यास 10,000 रुपयांचा दंड लावला जाईल असे आधीच जाहीर केले आहे.

दरवर्षी मिळते 1,000 कोटींपेक्षा अधिक देणगी 
- आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील या मंदिरात दरवर्षी 50 हजारांहून अदिक भावीक भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी येतात. 
- मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिराच्या हुंडीत दरवर्षी 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम दान स्वरुपात मिळते. 
- सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही मोठ्या प्रमाणावर दान स्वरुपात दिल्या जातात. 

1.30 लाख कोटींची संपत्ती 
- गेल्यावर्षी या मंदिराचे उत्पन्न 2600 कोटी रुपये होते. त्यापैकी 1018 कोटी रुपये रोख आले होते. 
- मंदिराच्या खजिन्यात 7 टन सोने, 30 टन चांदी आणि एकूण संपत्ती 1.30 लाख कोटींची आहे. 
- देशातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये तिरुपतीला सर्वाधिक दान मिळते. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...