आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tmc Leader And Saradha Scam Accused Kunal Ghosh Attempts Suicide In Kolkata Jail

तृणमूलच्या खासदारांचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, सेवन केल्या झोपेच्या 58 गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आणि तृणमूल कॉग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. कुणाल घोष हे कोलकाता येथील प्रेसिडेंसी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. कुणाल घोष यांनी झोपेच्या 58 गोळ्या सेवन करून आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

तुरुंग अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेच्या 58 गोळ्या सेवन केल्याचे माहिती घोष यांनी स्वत: तुरुंग अधिकार्‍यांना सांगितली. नंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. कुणाल घोष यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

सीबीआयने तीन दिवसांत शारदा चिटफंड घोटाळ्यातील अन्य आरोपींवर कारवाई केली नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही कुणाल घोष यांनी सोमवारी दिली होती.

दरम्यान, कोलकाता सेशन कोर्टात सीबीआयने घोष यांच्या विरोधात ऑक्टोबर 2014 मध्ये आरोपपत्र सादर केले होते. आरोप पत्रात घोष यांच्याशिवाय शारदा ग्रुपचे चेअरमन सुदीप्त सेन, त्यांची खासगी स्वीय देबजानी मुखर्जीचेही नाव आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कोण आहेत कुणाल घोष?