आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tmc Leader Madan Mitra Arrested In Connection With Saradha Scam In West Bengal

ममतांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट; शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी मदन मित्रांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा)

कोलकाता- शारदा चिट फंडच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याची विकेट पडली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना शुक्रवारी अटक केले.

मदन मित्रा यांना ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे दोन खासदारांना शारदा घोटाळ्याप्रकरणी अटक झाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मदन मित्रा यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. मि‍त्रा यांची तब्बल पाच तास कसून चौकशी झाल्यानंतर अधिकार्‍यांनी त्यांना अटक केले. यापूर्वी सीबीआयने तृणमुल कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार कुणाल घोष आणि संजय बोस यांना सीबीआयने यापूर्वीच अटक केली आहे.
सीबीआयने मित्रा यांना गुरूवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, मि‍त्रा यांनी शुक्रवारी येण्यास होकार दिला होता. मित्रा आज सकाळी 11 सीजीओ कॉम्पलेक्समधील सीबीआय कार्यालयात उपस्थित झाले. अधिकार्‍यांनी त्यांची कसून चौकशी केली. नंतर त्यांना अटक केली. मित्रांवर फसवणूक, गुन्ह्याचे षडयंत्र रचन्याचा आरोप आहे.
यापूर्वी गेल्या 18 नोव्हेंबर रोजी मि‍त्रा यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तब्बेतीचे कारण पुढे करून त्यांनी वेळ मारुन नेली होती. सरकार रुग्णालयात मित्रांना दाखल केले यापूर्वी मदन मित्रा यांचे माजी साहाय्यक पाबी करीम यांचीही सीबीआयने चौकशी केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, शारदा घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी तुरुंगात केला होता आत्महत्येचा प्रयत्न