आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TMC MP Tapas Pal Threatens To Kill CPI M Workers, Have Their Women Raped

बलात्कार करण्याची धमकी देणारे तृणमूलचे खासदार तपस पाल यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार आणि हत्या करण्याच्या वक्तव्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी पाल यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिला आयोगाने पाल यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे, तर माकपचे म्हणणे आहे, की पक्ष पाल यांची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे करणार आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि लोकप्रिय बंगाली अभिनेते तपस पाल यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करा, असे खळबळजनक आणि तेवढेच संतापजनक विधान केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या पत्नीने देखील याबद्दल माफी मागितली आहे. माकपने लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
काय बरळले खासदार पाल
तपस पाल तृणमूलच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले, 'जर तुम्ही (माकप कार्यकर्ते) तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माता-भगिणींचा अपमान करणे थांबवले नाही तर, आमचे कार्यकर्ते तुम्हाल सोडणार नाहीत. ते तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील. ते तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाहीत. येथे कोणी माकपचा कार्यकर्ता असेल तर लक्षात ठेवा तुम्ही चौमाहा येथील तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हात जरी लावला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. माझ्यासोबत हुषारी करु नका. मी तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे. मी काही कोलकात्याचा नाही, तर चंदननगरचा राहाणार आहे आणि गुंड देखील आहे. जर तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला तर, तुम्हाला गोळ्या घालू. तुमच्यात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा.'
पश्चिम बंगालमधील एका वृत्तवाहिनीवर खासदार पाल यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. ही क्लिप अस्पष्ट असली तरी, त्यात खासदार पाल हे धमकीच्या स्वरात माकप कार्यकर्त्यांना दरडावताना स्पष्ट दिसत आहेत.
खासदार तपस पाल यांच्या या धमकी आणि संतापजनक वक्तव्याचा सर्वच पक्षांकडून निषेध होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विधानाची निंदा केली आहे. पक्षाचे नेते खासदार डेरेक ब्रायन म्हणाले, 'खासदार पाल यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांचे वक्तव्य असंवेदनशील असून पक्षा त्याचे समर्थन करीत नाही.'
माकपने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदार पाल यांच्या विधानाची स्वतःहून दखल घ्यावी असे म्हटले आहे.

कोण आहे तपस पाल
तपस पाले बंगली अभिनेते आहेत. कृष्णनगर लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणुक जिंकली आहे. दोन वेळा (2001-2006 आणि 2006-2009) ते आमदार देखील राहिले आहेत. नंदिनी पाल या त्यांच्या पत्नी असून त्या टीव्ही कुकरी शो होस्ट करतात. त्यांना एक मुलगी असून ती देखील बंगाली चित्रपट सृष्टीत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, VIDEO