आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Congresss\' Chief Minister Decided In Karnataka

कर्नाटकाचा मुख्‍यमंत्री ठरणार आज, कॉंग्रेसच्‍या विधीमंडळ समितीची बैठक सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्यात मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाणार आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री मल्लिकार्जुन खारगे व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या प्रमुख दावेदार आहेत. 224 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसने 121 जागांसह बहुमत मिळवले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री वीरप्पा मोईली यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात आहे. यासंदर्भात कॉंग्रेसच्‍या विधीमंडळ समितीची बैठक सरु असून लवकरच त्‍यात निर्णय होणार आहे.

ज्येष्ठ मंत्री ए.के. अँटोनी, राज्याचे प्रभारी मधुसुदन मिस्त्री, लुईझिनो फालेरो यांच्यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची बैठकीला उपस्थित आहे. माजी मंत्री एम. मल्लिकार्जुन खारगे आणि विरोधी पक्ष नेते सिद्धरमय्या यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री वीरप्पा मोईली देखील शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी आमदाराची निवड हायकमांडकडून केली जाईल, असे सिद्धरमय्या आणि खारगे यांनी सांगितले.