आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग: हैदराबाद हॉटशॉट्स-बंगा बीट्स आज समोरासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - जगातली चौथ्या क्रमांकाची खेळाडू सायना नेहवाल इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये प्रथमच मंगळवारी आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळेल. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या हैदराबाद हॉटशॉट्ससमोर तळाचा संघ बंगा बीट्सचे आव्हान असेल. या सामन्याच्या निमित्ताने सायना नेहवाल आणि पी. कश्यप प्रथमच आमने-सामने असतील.
बंगाविरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी हॉटशॉट्सकडे असेल. दुसरीकडे बंगा बीट्सची टीम विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल.


बंगा बीट्सची मजबूत टीम
बंगा बीट्सचा संघ मजबूत आणि संतुलित आहे. जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाचा खेळाडू पारुपल्ली कश्यप आयकॉन खेळाडू असून, त्यांच्याकडून हून यू आणि ताय त्झू यींग सारखे प्रतिभावंत खेळाडू आहेत. संघ चांगला असला तरीही पुरुष एकेरीत बंगाच्या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मंगळवारचा सामना महत्वाचा असेल.


हैदराबादचा संघ वरचढ
सायना नेहवाल, अनुभवी तौफिक हिदायत आणि युवा अजय जयराम यांच्या उपस्थितीमुळे हैदराबादचा संघ स्पर्धेत आतापर्यंत वरचढ ठरला आहे. हैदराबादला पराभूत करणे वाटते इतके सोपे काम मुळीच नाही. त्यांच्याकडे दुहेरीत शीम गोह, वाह लीम, तरुण कोणा आणि प्रज्ञा गद्रे असे दमदार खेळाडू आहेत.


मेरिनही फॉर्मात
स्पेनची खेळाडू कॅरोलिना मेरिन, 2012 च्या लंडन ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता तसेच माजी वर्ल्ड नंबर वन पुरुष दुहेरीत कर्स्टन मोगेनसेनकडूनही बीट्सला चांगल्या कामगिरीची आशा असेल. अपर्णा बालन, अरविंद भट्ट, आदित्य प्रकाशसारखे युवा खेळाडू संघात आहेत.