आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Modi And Sharif Discuss Issue, Divya Marathi

मैत्री पर्वाच्या नव्या अध्यायाबाबत आज मोदी-शरीफ चर्चा करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या सरकारच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात मैत्रीचे पर्व पुढे नेण्याबाबत चर्चा होईल. दोघांमधील चर्चेचा अजेंडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाला नाही. अर्थात मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांदरम्यान अध्र्या तासाची बैठक होणार आहे. मोदी शरीफ सविस्तर चर्चेच्या मुद्दय़ांवर तसेच द्विपक्षीय व्यापार विस्ताराबाबतही बोलणी होऊ शकतात. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जर पाकिस्तानने भारतीय तुरुंगात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला तर भारत सीमेपलीकडील दहशतवाद व युद्धबंदीच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करू शकतो. शरीफ मोदी यांना पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण पुन्हा एकदा देऊ शकतात.
मोदी सरकारचा पहिला दिवस
पाकिस्तान - सीमेवरील तणाव कमी व्हावा. भारताला प्राधान्यक्रमाचा दर्जा मिळावा. सीमेपल्याड व्यापारासाठीच्या मार्गांवर चांगल्या सुविधा मिळाव्या. अतिरेक्यांवर नियंत्रण आणावे.
बांगलादेश - तिस्ता करार होण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असेल. हा मुद्दा यूपीए सरकारमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधामुळे प्रलंबित पडला आहे.
शेजारी देशांकडून मोदी सरकारच्या अपेक्षा
श्रीलंका - दक्षिण भारतीय नागरिकांच्या हितांखातर श्रीलंकेत तामिळवंशीय नागरिकांवर होणारे कथित अत्याचार तसेच त्यांच्यासोबत होणार्‍या भेदभावावर अंकुश आणण्यासाठी दबाव आणला जाईल.
म्यानमार - द्विपक्षीय संबंधांतर्गत सहकार्य वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पूर्वोत्तर भागातील अतिरेक्यांना म्यानमारमधील एका गटाकडून मिळत असलेल्या मदतीवर लगाम आणण्यास सांगितले जाईल.
महत्त्वाचा मुद्दा उचलल्यास चर्चेची तयारी
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व आता राज्यमंत्री बनलेल्या निर्माला सीतारमण या भारत-पाक नात्याच्या नव्या प्रारंभावर म्हणाल्या, नरेंद्र मोदी पाकिस्तानात जातील की नाही, हे आताच ठरवता येणार नाही. मात्र आम्ही डोके बंद करून काम करत नाही, अन्यथा शरीफ यांना आमंत्रण पाठवलेच नसते. तथापि, कोणत्याही पूर्वनिर्धारित मुद्दय़ावर चर्चा केली जाणार नाही. एखादा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाच तर दोन्ही नेते त्यावर चर्चा करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. ही फक्त औपचारिक चर्चा असेल. सध्या तरी यापेक्षा वेगळे अंदाज बांधले जाऊ नयेत.
आम्ही पाकिस्तानातून खूप मोठय़ा शुभेच्छा घेऊन आलो आहोत. दोन्ही देशांत मजबूत जनादेश असलेले सरकार आहे. आम्हाला एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर करून नवा अध्याय सुरू करावा लागेल व पुढे पावले टाकण्याची गरज आहे. - नवाझ शरीफ