आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हनुमान चालिसा’ च्या जपाने आज रावणवध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देश-परदेशातील लाखो हनुमान भक्तांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) आयोजित ‘एक शाम जीत के नाम ’ची जोरदारी तयारी केली आहे. सायंकाळी 7 ते 8 दरम्यान या महापर्वाचे जयपूरमध्ये आयोजन होणार आहे.


कार्यक्रमाच्या निमित्ताने पं. विजयशंकर मेहता यांचे ‘लंका कांडच्या हनुमानजी द्वारे शंका समाधान ’ यावर व्याख्यान होईल. रावण दहन करण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण आवश्य करण्यात यावे, असे आवाहन शनिवारच्या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. यातून आपल्या आतील रावणाचे दहन होईल. हनुमान आपल्या सर्व समस्यांचे समाधान करतील. त्याचे आयोजन सायंकाळी 7 ते 8 दरम्यान भारत तसेच परदेशात एकाच वेळी होईल. कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाहेती व समन्वयक सी.एम. शारदा म्हणाले, जीवन प्रबंधन समूह व महापर्व आयोजन समिती, जीवन प्रबंधन गुरू पं. विजयशंकर मेहता यांच्या प्रेरणेतून आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य कार्यक्रम जयपूरमध्ये होईल. आस्था, आयबीसी 24 इत्यादी वाहिन्यांवरून त्याचे थेट प्रसारण होईल. सायंकाळी सहा ते सात दरम्यान संगीत भजन सादर होणार आहे. देशातील विविध शहरात संयोजक मंदिराचे प्रांगण, स्टेडियम, उद्यान, सभागृह, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी सामुदायिक स्वरूपात याचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.