आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Togadia With Modi In Power No Stir For Ram Temple Needed

केंद्रात \'भावा\'चे सरकार, राममंदिरासाठी आंदोलनाची गरज काय -तोगडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - दिल्लीत आमच्या भावाचे (नरेंद्र मोदी) सरकार आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) नेते प्रवीण तोगडिया म्हणाले. आपल्याच सरकारविरोधात कोणी आंदोलन करते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आम्हाला आशा आहे, की मोदी आणि त्यांचे सरकार मंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करेल. लखनऊ येथे आयोजित व्हीएचपीच्या धर्म रक्षा निधी अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

का महत्त्वाचे आहे तोगडियांचे वक्तव्य
- उत्तर प्रदेशात पुढील वर्षी (2017) विधानसभा निवडणुका आहेत.
- या दरम्यान कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, असे व्हीएचपीला वाटते.
- असेही बोलले जाते, की तोगडियांनी असे वक्तव्य करण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला कोणताही तोटा होऊ नये यासाठी त्यांचे हे सावध पाऊल आहे.

आणखी काय म्हणाले तोगडिया
- निवडणुकांमध्ये व्हिएचपीची कोणतीही भूमिका नसते. राममंदिर हा काही निवडणुक मुद्दा नाही.
- राममंदिरासाठी आंदोलन तेव्हा सुरु केले गेले होते, जेव्हा केंद्रात विरोधी पक्षाचे (काँग्रेस) सरकार होते.
- आता आमचे भाऊ केंद्रात आहेत, तर व्हिएचपीला मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज काय.
- त्यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही परेशान होण्याची गरज नाही.

सोमनाथ मंदिरासारखे उभारले जाईल राममंदिर
- तोगडिया म्हणाले, अयोध्येतील राम मंदिर गुजरातच्या सोमनाथ मंदिरासारखे उभारले जाईल.
- राममंदिरासाठी कायदा करण्याकरिता केंद्राने लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त सत्र बोलावले पाहिजे.
- जर केंद्राने संसदेत कायदा मंजूर केला तर अयोध्येत त्वरीत मंदिर उभारले जाईल.

पाकिस्तान मुद्यावर काय बोलले तोगडिया
- पाकिस्तानची स्थापना भारताच्या विरोधात झाली आहे. त्यामुळे ते सुधारू शकत नाहीत.
- पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तत्काळ श्रीनगरवर हल्ला केला होता.
- एक तृतियांश काश्मीर आजही त्यांच्या ताब्यात आहे.
- जेव्हा-जेव्हा भारताना मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा-तेव्हा त्यांनी धोका दिला आहे.
- अटलजींनी लाहोर बससेवा सुरु केली तर कारगिल युद्धाच्या यातना सोसाव्या लागल्या.
- माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मैत्रीचा हात पुढे केले तर मुंबईवर हल्ला झाला.
- आता पंतप्रधान मोदी पाकिस्तानात गेले तर पठाणकोटवर हल्ला झाला.
- मोदी सरकारला ठरवावे लागणार आहे, की पाकिस्तानसोबत कसे संबंध ठेवायचे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुठून आले राममंदिरासाठी दगड