आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाक्यावर चॉकलेट दिल्यास 10 लाख रुपये दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - टोल नाक्यांवर टोल भरल्यानंतर सुटे पैसे नसल्याची सबब दाखवून चॉकलेट किंवा नमकीन दिल्यास टोलचालकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारणी किंवा कंत्राट रद्द करण्याची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. यापुढे उभारण्यात येणार्‍या टोलनाक्यांना हा नियम लागू होईल. सुटे नसल्याची सबब पुढे करून सर्वच टोलनाक्यावर सर्रास चॉकलेट किंवा नमकीनचे पाऊच दिले जातात. एनएचएआयचे मुख्य महासंचालक के. वेंकटरमण यांनी याबाबत अधिसूचना काढली असून असे प्रकार आढळून आले तर त्याचे कंत्राट रद्द करण्याची तरतूदही यात आहे.
350 टोल प्लाझा देशभरात
13000 किमी मार्गांसाठी या नाक्यांवर
9000 कोटी रु. वसूल केले जातात