आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पैजेत गिळली एक फूट लांब सांडसी, राजस्‍थानच्‍या युवकाचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालौर (राजस्थान) - कोण कशाची पैज लावेल काही सांगता येत नाही. राजस्‍थानातही असाच एक प्रकार घडला. येथील एका युवकाने आपल्‍या मित्रांसोबत एक फूट लांब सांडसी गिळून बाहेर काढण्‍याची पैज लावली. त्‍यासाठी त्‍याने सांडसी गिळलीसुद्धा. मात्र, त्‍याला ती बाहेर काढता आली नाही. त्‍यामुळे आठ तास चाललेल्‍या अवघड शस्‍त्रक्रियेनंतर ती बाहेर काढण्‍यास यश आले. भंवरालाल सुराराम मेघवाल (वय 28) असे त्‍या युवकाचे नाव असून, तो जालौर जिल्‍ह्यातील पांचला गावातील रहिवासी आहे.
घरी काहीच सांगितले नव्‍हते
भंवरालालने मित्रांसोबत लावलेली पैज जिंकण्‍यासाठी सांडसी गिळली. परंतु, त्‍याला ती बाहेरच काढता आली नाही. मात्र, झाल्‍या प्रकाराबाबत त्‍याने आपल्‍या कुटुंबियांना काहीही सांगितले नाही. परंतु, त्‍याच्‍या गळ्यावर प्रचंड सूज आल्‍याने आणि त्रास होत असल्‍याने हा प्रकार उघड झाला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुटुंबीयांना वाटले भूतप्रेताने झपाटले...एक्सरेमध्‍ये दिसली सांडसी...