आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला जंगल सफारीला : भारतातील या आहेत टॉप 10 WILD LIFE सेंच्युरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यापैंकी ब-याच जणांना जंगल सफारी करण्याची आवड असते. सफारी करणारी व्यक्ती वेळ मिळाला की सर्वात पहिले त्याला आवडणा-या जंगलाची सफारी करण्यासाठी निघते. अशाच जंगल सफारी मनापासून आवडणा-यांसाठी भरतामध्ये काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. येथे आल्यानंतर भटकंती करणा-यांचे मन भरून जाईल.
भारतामध्ये नैसर्गिक जगंलाची कमी नाही. अशीच पर्यटकांना भुरळ घालणारी भारतातील काही निवडक ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. या ठिकाणांची माहिती वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही येथे जाल.
1. रणथैंभोर नॅशनल पार्क, राजस्थान -
जगभरातील असंख्य पर्यटकांचे हे अतिशय लोकप्रिय स्थळ आहे. येथे नजरेस पडणा-या वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य पाहून येथे येणा-या प्रत्येक पर्यटकांचे डोळे फिरतात. रणथैंनभोर राष्ट्रीय अभयारण्य येथील वाघांमुळे जगप्रसिद्ध आहे. या अभयारण्याला 1981 मध्ये राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे अभयारण्य अरवली आणि विंध्य पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. या अभयारण्यात वाघ आणि चिते मोठ्या प्रमाणावर बघण्यास मिळतात. तसेच येथे चिंकारा,जंगली मांजर आणि पक्षांच्या 200 पेक्षा अधिक प्रजाती बघायला मिळतात.
2. जिम कार्बोट नॅशनल पार्क -
भारतातील हे सर्वात जुन्या अभयारण्यापैंकी एक आहे. नैसर्गिक सौंदर्य बघून नक्कीच तुमचे डोळ्यांचे पारणे फेडले जातील. हे पार्क रामगंगा नदीच्या किना-याला वसलेले आहे. उत्तराखंडच्या नैनिताल जवळ असलेले हे पार्क हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. या पार्कमध्ये तुम्हाला विभिन्न वन्यजीव,वनस्पती बघायला मिळतील. या अभयारण्याची मजा तुम्ही हत्तीवर बसूनही घेऊ शकता.पहिले अभयारण्य रामगंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जायचे. पण 1957 मध्ये याचे नाव बदलून कॉर्बोट नॅशनल पार्क असे करण्यात आले. या अभयारण्यात तुम्ही वाघ,चित्ता,माकडे,हरिण,हत्ती यांसारखे प्राणी अगदी जवळून बघू शकता.
3. बाधवगढ राष्ट्रीय उद्यान, मध्ये प्रदेश -
मध्ये प्रदेश मधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान म्हणून हे ओळखले जाते. 1968 मध्ये हे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान जगभरात येथे असणा-या वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पांढ-या रंगाच्या चित्ता याच उद्यानात सापडला होता. 1993 मध्ये हे उद्यान टायगर प्रोजेक्टच्या स्वाधिन करण्यात आले. या उद्यानात फिरताना तुम्हाला वाघांना रस्त्याच्या मधोमध बसलेले पाहण्याचाही योग येईल. या उद्यानात वाघांशिवाय निलगाय,चिंकारा असे प्राणी देखील बघायला मिळतील. येथे तुम्ही हत्तीची सवारी अथवा गाडीतून फिरू शकता.
4. पेरिअर नॅशनल पार्क,केरळ -
दक्षिण भारतातील अतिश्य सुंदर आणि प्रसिद्ध असे हे उद्यान आहे. वाघांसाठी हे उद्यान आरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पेरिअर नदी जवळ वसलेले हे उद्यान 1040 एवढ्या मोठ्या क्षेत्रात पसरलेले आहे. 1998 मध्ये हे हत्ती संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
5. काझिरंगा नॅशनल पार्क, आसाम -
येथे असनारे एकशिगी गेडे हे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे येथे दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. आसाममधील हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 430 किमी मध्ये विस्तारलेले आहे. हिवाळ्यात येथे विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
6. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालच्या दक्षिणी भागात असलेले हे उद्यान गंगा नदी जवळील सुंदरबन डेल्टा क्षेत्रात वसलेले आहे. हे उद्यान रॉयल बंगाल टायगर यासाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानात गोड्या पाण्यात राहणा-या मगरी बघायला मिळतात. 1984 मध्ये या उद्यानाला रष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
7. कान्हा राष्ट्रीय उद्यान,मध्य प्रदेश -
मध्य प्रदेश राज्य हे येथील राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. हे उद्यान मंडला जिल्ह्यात वसले आहे. हे उद्यान नैसर्गिक सुंदरतेमुळे नेहमीच पर्यटकांच्या विशेष पसंतीला उतरले आहे. हे उद्यान 1933 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि 1955 मध्ये रष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या उद्यानांमध्ये अनेक पशु आणि पक्षांच्या जाती संरक्षित करण्यात आले आहेत.
8. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान,उत्तराखंड -
नंदा देवी या पर्वतावर वसलेले हे उद्यान आहे. या उद्यानात फुलांच्या अनेक बागा आहेत. 1982 मध्ये हे उद्यान राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या उद्यानांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पक्षी, अनेक जातींची फुले, आणि रंगीबेरंगी फुलपाखरे बघायला मिळतील.
9. बेतला राष्ट्रीय उद्यान,झारखंड -
हे उद्यान 1974 मध्ये बनवण्यात आले. हे सर्वात जुन्या टायगर संरक्षित क्षेत्रापैकी आहे. हे उद्यान पहिले पमालू टायगर्स रिझर्व या नावाने ओळखेले जायचे. या उद्यानात तुम्हाला वाघ,जंगली अस्वल,सांबर,निलगाय,मोर हे प्राणी बघायला मिळतात. या उद्यानात 970 प्र जातींची झाडे 174 प्रजातींचे पक्षी, आणि 100 पेक्षा जास्त औषधी वनस्पती बघायला मिळतात. येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
10 गिर राष्ट्रीय उद्यान -
गुजरातमधील हे राष्ट्रीय अभायरण्य आहे. हे देखील वाघांसाठीचे संरक्षित क्षेत्र आहे. जुनागड नगरपासून 60 किमी अंतरावर असलेले हे उद्यान 1295 वर्ग किमी मध्ये विस्तारलेले आहे. गिरिवन संरक्षित क्षेत्राची स्थापना 1913 आशियामधील वाचलेल्या सर्वात मोठ्या सिहांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली होती.1965 मध्ये या उद्यानाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.