आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त पंजाबचे मुख्यमंत्री ठरले; उर्वरित चार राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी 13 नेते शर्यतीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेला विश्वास हा बहुमताच्याही पुढे घेऊन गेला आहे. येथे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला नव्हता. तेव्हा आता देशातील सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपमध्ये अनेक दिग्गज असले तरी 6 प्रमुख चेहरे या स्पर्धेत आहेत. 
 
विधानसभा निवडणुकीआधीपासून राजनाथसिंह याचे नाव मुख्यंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. दुसरे नाव आहे उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश शर्मा, पक्षाचे फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ आणि स्वतंत्रदेव सिंह हे नेते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. 
 
राजनाथ सिंह 
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनऊ मतदारसंघातून लोकसभेत गेलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांना सत्ता आणि संघटना दोन्हीचा मोठा अनुभव आहे. प्रदेशाध्यक्षापासून पक्षाध्यक्षापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी पूर्ण केल्या आहेत. भाजप त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून उत्तर प्रदेशात पाठवण्याची शक्यता आहे. 
 
केशव प्रसाद मौर्य 
- केशव प्रसाद मौर्य हे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. युवा चेहरा आणि संघटनेवर पकड असलेले मौर्य मोदींपासून भाजपचे चाणक्य अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2012 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना फुलपूर येथून उमेदवारी दिली होती. कधीकाळी पंडित नेहरुंचा मतदारसंघ असलेल्या फुलपूरमधून दलित समाजाचे केशव प्रसाद मौर्य विजयी झाले होते. त्यानंतर शहांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मौर्य यांनी संघासोबतच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातही काम केले होते. विहिंप अध्यक्ष अशोक सिंघल यांचे ते जवळचे होते. भाजप विजयी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना सर्वाधिक क्रेडिट जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि तेच पुढे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ही शक्यता अधिक वाटत आहे. 
 
गोवा : बहुमतापासून ५ जागा कमी, राज्यात काँग्रेस सरकारची शक्यता
- लुई जिन्हो फरेरियो
काँग्रेसला १७ जागा मिळाल्या. ५ जणांचा पाठिंबा शक्य. पूर्वीही सीएम होते. सोनियांचे विश्वासू. २०१४ पासून दिल्लीतून गोव्यात येऊन पक्षकार्य.
 
- दिगंबर कामत
२००७मध्ये कमी जागा असूनही सरकार स्थापन केले, ५ वर्षे चालवले. गोव्यातून काँग्रेसचे सर्वात चर्चेत असलेले नेते. संधी मिळू शकते.
 
मणिपूर : इबोबी चौथ्यांदा दावेदार
-इबोबी सिंह
चौथ्यांदा मुख्यमंत्री होणे निश्चित. काँग्रेसला बहुमतासाठी केवळ ३ सदस्य हवेत. इबोबींविरुद्ध उभ्या इरोम शर्मिलास केवळ 
९० मते पडली.
   
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...