आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Top Hot Seats In Punjab Badal, Sidhu, Capt Amrinder Singh Top Focus, Eyes On Sidhu, Bhagwant Mann, Sukhbir Badal Too

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग बनले \'किंग\', अकालीदलाला \'आप\'ने पछाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवल आहे. तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसने जोरदार वापसी केली आहे. विशेेष म्हणजे आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी अकाली दलाला पछाडले आहे. काँग्रेसने 77 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध करत पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. आपने अकाली दल+ भाजपला पछाडत 22 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. सत्ताधारी बादल सरकारला जनतेने स्पष्ट नाकारले आहे. अकाली दलाला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत.

अमरिंदर सिंग ठरले पंजाबचे किंग...
पूर्व मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग (74) हे पंजाबचे किंग ठरले आहे. आज (शनिवारी) त्यांचा वाढदिवस आहे. पंजाबमधील जनतेने विजयाचे मोठे गिफ्ट दिल्याचे अमरिंदर यांनी म्हटले आहे. कॅप्टन लवकरच राज्यपाल व्ही. पी. बदनौर यांची भेट घेणार आहे. त्यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे.
 
पंजाबच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, पंजाबमध्ये काँग्रेस व आपमध्ये जोरदार लढत होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. भाजप आणि अकाली दलाचे पानिपत होईल, असेही भाकीत वर्तवले गेले होते. ते खरे ठरताना दिसत आहे.

विजय-पराजयाचा कोणावर होईल परिणाम?
# प्रकाश सिंग बादल आणि अकाली दल
- 90 वर्षीय बादल यांची ही शेवटची निवडणूक ठरू शकते. एक्झिट पोलने दिलेले अंदाज तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. भाजप यूती तोडू शकते.

# कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस
- 2012 मध्ये अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला होता. एक्झिट पोलने वर्तवल्या अंदाजाप्रमाणे पंजाबमध्ये काँग्रेस सर्वात  मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

# अरविंद केजरीवाल:
- अकाली दलासोबत युती करू शकतात.

पहिल्यांदा तिरंगी लढत...
- 117 जागांसाठी भाजप-अकाली, काँग्रेस आणि आमआदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे.
- 1947 पासून अकाली दल आणि काँग्रेसचे पंजाबमध्ये वर्चस्व राहिले आहे.
- यंदा मात्र, आम आदमी पक्ष निवडणुकीत उतरल्याने तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

बादल म्हणाले, आत्मपरिक्षण करणार...
- पंजाबमध्ये अकाली-भाजपच्या मोठ्या पराभवानंतर मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्मपरीक्षण करणार असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.

UPDATE
- पंजाबमधील यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे अभिनंदन
- अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्याचे कॅप्नन  अमरिंदर सिंगयांनी सांगितले.
- पतियाळातून कॅप्टन अमरिंदर सिंग 51000 मतांनी विजयी
- आनंदपूर साहिबमधून काँग्रेसचे कनवार पालसिंग विजयी
- जालंधर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे सुशील कुमार विजयी
- प्रकाश सिंग बादल रविवार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
- जनतेचा कौल मान्य, अरविंद केजरीवाल यांनी केले ट्वीट, पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, भविष्यातही संघर्ष सुरु राहील.
- अमृतसरमधून पाचही जागावर काॅँग्रेसचा विजय
- काँग्रेसने विधिमंडळ नेत्यांची उद्या (रविवारी) बैठक बोलावली आहे.
- पंजाबमध्ये काँग्रेस आघाडीवर- काँग्रेस: 72, अकाली: 21 आणि आप 21 जागांवर
- पूर्व मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग (74) यांचा आज (शनिवारी) वाढदिवस आहे. शेवटची निवडणूक असल्याचे अमरिंदर सिंग यांनी आधीच जाहीर केले होते.  
- जलालाबादमधून सुखबीर बादल आघाडीवर आहेत. भगवंत मान ‍तिसर्‍या क्रमांकावर
- अमृतसर(पूर्व) मधून नवज्योत सिंग सिद्धू यांनी विजय मिळवला.
- पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमताचा आकडा.
- काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह पिछाडीवर
- मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात
- पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान झाले आहे.
- पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या आघाडीच्या दिशेने मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आघाडीवर
- काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह पिछाडीवर
- मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात
- पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान झाले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक  करून वाचा... पंजाबमधील HOT SEATS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...