आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये एके-47 रायफल, स्फोटकांसह दहशतवादी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूंछ - निवडणूक काळात घातपात करण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यास एके-47 रायफल व स्फोटकांसह अटक करण्यात आली. मुहंमद इसाक असे अतिरेक्याचे नाव असून त्याला शनिवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील दिगवार सीमा रेषेजवळील गावात अटक करण्यात आली. त्याच्याकडून एके-47 रायफल, दोन मॅगझिन्स, आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली.

आरोपीने 2011 मध्ये शस्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक काळात घातपात करण्यासाठी तो काश्मीरमध्ये परतला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. गुप्तचर संस्था आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेचे सहा मतदारसंघ असून येथे 10, 17, 24, 30 एप्रिल आणि 7 मे रोजी मतदान होणार आहे.