आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Well Dressed Leaders Of The World Modi Kamla Bisesar David Cameron

मोदींप्रमाणेच जगातील या सहा नेत्यांच्या वेशभुषेचेही नेहमीच होते कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यापासून ते थेट मोदी पंतप्रधान बनेपर्यंत त्यांच्या कपड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. विविध रंगांचे त्यांचे कुर्ते आणि जॅकेट्स सगळ्यांच्यात आकर्षणाचे केंद्र बनले होते. तसेच त्यांच्या कपड्यांवर वेळोवेळी दिसणारे कमळ आणि तिरंग्याचीही तेवढीच चर्चा झाली. भारतीय नेत्यांच्या ड्रेसिंग सेंसमध्ये नेहरू जॅकेटनंतर सर्वात जास्त झाली ती मोदी जॅकेटचीच. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीही सर्वांचे लक्ष याकडेच लागले होते, की मोदी या सोहळ्यासाठी काय परिधान करणार?
अनेक मुलाखतींमध्ये तर मोदींना त्यांच्या फॅशन डिझायनरचे नावही विचारण्यात आले आहे. कोणत्या रंगाचा कुर्ता आणि जॅकेट घालायचे ते आपल्या आवडीनुसारच ठरवत असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येतवेळी हा विषय टाळला आहे. मोदींप्रमाणेच जगभरात असे अनेक नेते आहेत, ज्यांच्या ड्रेसिंग सेंसबाबत नेहम चर्चा होते...पाहुयात असेच काही नेते.