आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tortoise Will Participate In Ganga Cleaning Mission

गंगा साफ करतील मिलसोनिया गँगेस्टिक कासवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगा नदीची असह्य घाण, प्रदूषण आता चंबळच्या नदीतील कासवे स्वच्छ करतील. केंद्र सरकारच्या गंगा कृती योजनेत चंबळच्या मिलसोनिया गँगेस्टिक प्रजातीच्या कासवांनाही सहभागी करून घेतले आहे. या विशेष कासवांना लवकरच चंबळच्या खोऱ्यातून उचलून नेऊन उत्तर प्रदेशच्या वाराणसीस्थित गंगेत सोडून देण्यात येईल. यासाठी चंबळ सेंक्चुरी (अभयारण्य) तील कासवांना एकत्र आणि संरक्षित करण्यात कर्मचारी गुंतले आहेत.

गंगा कृती आराखड्यात चंबळची कासवे
वन्यजीव विशेषज्ञ आणि चंबळ अभयारण्याचे रेंजर डॉ. ऋषिकेश शर्मा सांगतात की, मिलसोनिया गँगेस्टिक कासवांची एक प्रजाती अशी आहे की, जी फक्त मांसाहारीच आहे. गंगा नदीत लोक अंतिम संस्कार केल्यानंतर मृतदेहाचे जलदान करतात. म्हणजे मृतदेह गंगा नदीत सोडून देतात. मिलसोनिया गँगेस्टिक कासवे नदीत मानवाच्या त्या मृतदेहाला खाऊन टाकतात. यामुळे अर्थातच गंगा स्वच्छ व शुद्ध होणार. मिलसोनिया कासवांची ही दुर्मिळ प्रजाती आता जवळजवळ सर्व नद्यांमधून नष्ट होत आहे. चंबळच्या खोऱ्यात ही कासवे वाचली आहेत. या कासवांची १४०० बच्ची चंबळमध्ये वाढलीत. यांची संख्या जवळपास पाच हजार झाल्यानंतर यांना गंगा नदीत पाठवण्यात येईल. मिलसोनिया गँगेस्टिक कासवांचा एक जत्था पाच वर्षापूर्वीहीदेखील चंबळ नदीतून गंगा नदीसाठी पाठविला गेला होता. त्यांना पूर्वीही ही कासवे वेळोवेळी गंगेत पाठविली जात होती. मात्र, त्या कासवांची देखरेख न झाल्यामुळे यांची ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत गेली.
कारखान्यांमुळे गलिच्छ झाली आहे गंगा
हृषीकेशपासून ते कोलकातापर्यंत गंगेच्या किनाऱ्यावरील अणुऊर्जा निर्मिती केंद्रे आिण रासायनिक खते तयार करण्याचे कारखाने आहेत. कानपूरचा जाजमऊ भाग हा चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. इथपर्यंत येता येता गंगेचे पाणी एवढे प्रदूषित होते की, त्यात डुबकी मारणे तर दूरच, तिथे उभे राहून श्वास घेणेदेखील अशक्य झाले आहे.
आपल्या चंबळ नदीत मिलसोनिया गँगेस्टिक प्रजातीची कासवे मिळतात. ही कासवे मृतदेहांना खाऊन टाकतात. याला गंगा कृती आराखड्यात सहभागी केले गेलेले आहे. यासाठीच या कासवांना चंबळ नदीतून गंगा नदीत पाठवले जाणार आहे. ही कासवे गंगेला स्वच्छ बनवतील.
- राजेशकुमार, मुख्य वनसंरक्षक, ग्वाल्हेर-चंबळ.