आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tour Of Royal Train Palace On Wheels Starts Rajasthan

हे हॉटेल नाही, तर ही आहे शाही रेल्वे, 5 स्टार सुविधांपासून राजेशाही थाटात मिळते जेवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - रॉयल राजस्थान ऑफ व्हिल्स या शाही रेल्वेने गांधीनगर रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री 10 वाजता आपला प्रवास सुरू केला. ही रेल्वे दिल्लीवरून निघाली असून जोधपुर, उदयपुर, चित्तौड़गढ़, सवाईमाधोपूरनंतर ख्रजराव, बनारस, आग्रा आणि पुन्हा दिल्लीला निघणार आहे.
रॉयल राजस्थान ऑफ व्हील्स 8 ऑक्टोबर ते 29 मार्च 2015 पर्यंत प्रवास करणार आहे. आतापर्यंत या रेल्वेची 32 टक्के बुकिंग झाली आहे. व्हील्सचे जनरल मॅनेजर सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, मागील वर्षीपेक्षा जास्त प्रवाशांनी या वेळेस बुकींग केले आहे. या रेल्वेतून प्रवास करणारण्यासाठी प्रतिव्यक्ती जवळपास 30 हजार रुपये एवढा खर्च येतो.

शाही थाटाकरीला आहे प्रसिध्द
23 कोच असलेल्या या शाही रेल्वेमध्ये एकूण 14 सलून, एक स्पा कोच, दो महाराजा आणि महारानी रेस्टॉरंट तसेच एक रिसेप्शन कम बार कोचचा समावेश आहे. यामध्ये 104 पर्यटक राजेशाही थाटात प्रवास करू शकतात. ही रेल्वे एका आठवड्यात सर्व प्रवाशांना राजस्थानच्या सर्व प्रमुख पर्यटन स्थळांसोबतच जागतीक ऐतिहासिक स्थळ असलेल्या ताजमहालचेही दर्शन घडवते.
ही रेल्वे दिल्लीतील सफदरजंग रेलवे स्टेशनवरून आपला प्रवास सुरू करते त्यानंतर राजस्थानमधील जयपूर, सवाई माधोपूर, चित्तौड़गड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर आणि आग्रा असे करत पुढच्या बुधवारी दिल्लीला पोहोचते.

सुविधा

> सर्व कोचमध्ये राजेशाही महलांप्रमाणे इंटेरिअर करण्यात आले आहे.
> सुविधांनुसार सर्व कोचचे नाव देण्यात आले आहे. यामध्ये शीश महल आणि ताजमहाल अशीही नावे देण्यात आली आहेत.
> रेल्वेमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे स्प्राईट्स आणि वाईनसुध्दा उपलब्ध आहे.
> रेल्वेमध्ये महाराजा आणि महाराणी अशा नावाचे दोन रेस्टॉरंट आहेत.
> जेवणामध्ये प्रवाशांसाठी भारतीय खाण्यासोबतच यूरोपीयन, चीनी, तसेच बेटांवरील जेवणही देण्यात येते. यासोबतच अनेक लक्झरी सुविधा यात देण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या शाही रेल्वेच्या आतील फोटो...