गेल्या महिन्यात थलॉट येथील व्यास नदीमध्ये 25 मुलांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांना आपले प्राण मुकावे लागले. लोक मात्र, यापासून धडा घ्यायला तयार नाहीत. गुरूद्वारा जवळून जाणा-या व्यास नदीमध्ये अनेक पर्यटक आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरतात. या नदीचे पाणी उष्णतेमुळे आचनक वाढते यामुळे नदीला पूर येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पर्यटकांच्या जीवीताला धोका होणार नाही. यासाठी पर्यटकांनी नदीमध्ये जाऊ नये असे आवाहन प्रशासाकडून करण्यात आले आहे. मात्र, पर्यटक सुचनेचे पालन करत नसल्यामुळे त्यांच्या जीवीताला धोका होऊ शकतो. हैदराबाद येथील विद्यार्थी फोटोग्राफी करण्यासाठी आले असताना अचानक पूर आल्यामुळे या नदीमध्ये 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
पुढील स्लाईडवर पाहा छायाचित्रे...