आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourist News In Marathi, Lakh Of Tourist Come At Surajkund , Divya Marathi

सूरजकुंड मेळ्यास एकाच दिवसात लाखावर पर्यटकांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद- फरिदाबाद येथे आयोजित 28 व्या सूरजकुंड आंतरराष्‍ट्रीय कला महोत्सवातील रंगत उत्तरोत्तर वाढतच आहे. रविवारी सुटीच्या दिवशी या मेळ्याला लाखाच्या वर पर्यटकांनी भेट दिली. हा विक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोमवारी ओडिशाच्या कलाकारांनी ओडिसी नृत्याचे विविध कलाप्रकार सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दुसरीकडे मेळ्यातील शिल्पकृतीही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्थानिक कलाकारांनी तयार केलेली उंटाच्या हाडांपासून बनवलेली रेल्वेची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.