आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानात चक्रीवादळ, 2037 पर्यटक सुरक्षित, नेवी-एअरफोर्सने चालवले रेस्क्यू ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व पर्यटकांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. - Divya Marathi
सर्व पर्यटकांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोर्टब्लेअर/नवी दिल्ली- अंडमान-निकोबारमधील हॅवलॉक आयलंडमध्ये आलेल्या चक्रीवादळात अडकलेल्या 2037 पर्यटकांना शुक्रवारी सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. एअरफोर्स आणि नेव्हीच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन चक्रीवादळात अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका केली.

अंदमानात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे बचाव कार्यत अनेक अडचणी आल्या. मात्र, शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने अडकलेल्या पर्यटकांना पोर्टब्लेअरमध्ये सुरक्षित आणण्यात आले. सर्व पर्यटक मागील काही दिवसांपासून अडकून पडले होते. यात महाराष्ट्रातील 50 हून जास्त पर्यटकांचा समावेश आहे.

दरम्यान, शुक्रवारी हवामानात थोडा बदल झाल्यानंतर नेव्ही, कोस्टगार्ड आणि एअरफोर्सच्या जवानांनी रेस्क्यू ऑफरेशन राबवून सर्व पर्यटकांची सुटका केली. एमआय 17 व्ही-5 मिलिटरी ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर, तीन पवन हंस हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या सात नौवकांनी पर्यटकांना पोर्टब्लेअरला पोहोचले.

हवामान विभागाने 'वरदा' वादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमानात हायअलर्ट जारी केला होता. पोर्टब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या नील बेटावर 5 डिसेंबरला अचानक पाऊस आणि वादळ आले होते. परिणामी हवाई आणि जलवाहूतक थांबवण्यात आली होती.

चक्रीवादळात अडकेले होते 320 विदेशी पर्यटक
- हॅवलॉक आयलंडवर आलेल्या चक्रीवादळात अडकलेल्या 1900 पर्यटकांमध्ये 320 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. हॅवलॉक हे अंदमानातील सर्वात मोठे आयलंड आहे.
- पर्यटकांना हॅवलॉक आयलंडवरून राजधानी पोर्टब्लेअरला सुखरुप पोहोचवण्यात आले. या कामात प्रशासनाने नेव्हीची मदत घेतली होती.
- सूत्रांनी सांगितले की, हॅवलॉक आयलंडकडे नेव्हीचे बित्रा, बंगराम, एयूसी 38 आणि कुंभीर जहाज पाठरूण्यात आले आहे.
- बुधवारी हे जहाज पोर्टब्लेयरहून रवाना झाले होते. एअरफोर्सनेही रेस्क्यूमध्ये 3 हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते.

पर्यटकांनी हॉटेलबाहेर पडू नये- उपराज्यपाल
-अंदमानचे उपराज्यपाल (एलजी) जगदीश मुखी यांनी सांगितले की, वरदा वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना हॉटेलमध्येच थांबण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
- वादळामुळे अडकून पडलेल्या पर्यटकांकडून जास्त चार्ज वसूल करू नये. त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना अंदमानातील हॉटेल मालकांना देण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, अंदमानात भारतीय जवानांनी चालवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...