आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावेदला आश्रय देणारे चौघे अटकेत, काश्मीरमध्ये दोन भावांनी नावेदला केली मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने शनिवारी दहशतवादी मोहंमद नावेद ऊर्फ उस्मान याची कसून चौकशी केली. नावेदला मदत करणाऱ्या काश्मीरमधील पुलवामा येथील दोन भावांसह चार लोकांना एनआयएने अटक केली आहे.

हे दोघे बंधू अवंतीपुरा येथे आयएएफ स्टेशनमध्ये सुतारकाम करत होते, तर अन्य एक व्यक्ती चालक आहे. हे चौघेजण काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या स्लीपर सेलमध्ये काम करत होते. त्यांनी नावेदला काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपण्यास मदत केली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.सूत्रांनी सांगितले की, नावेदने तपासात दिलेल्या माहितीनुसार त्याचे आणखी दोन साथीदार कुपवाडामध्येच आहेत. त्यांच्यावर तसेच नोमानवर रामबन व उधमपूर येथील हल्ल्याची जबाबदारी सोपवली होती. तर इतर दोघांवर इतर ठिकाणी हल्ल्याची जबाबदारी
टाकण्यात आली होती. नोमान दोन महिने काश्मीरमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या दहशतवाद्यांना भेटला. त्यात पाकिस्तानी दहशतवादी कासीम, दुजान, स्थानिक दहशतवादी तहान, मजीद झरगर, हपतउल्ला, अबु बकर व फलहद्दीनचा समावेश आहे. एनआयएने या दहशतवाद्यांची छायाचित्रे दाखवून त्याच्याकडून या माहितीची खातरजमा करवून घेतली. त्याने फोटो ओळखले. काश्मीरमध्ये अनेक पथके सातत्याने छापे टाकत असून रात्री उशिरा दोघांना पकडण्यात आले आहे. पाकमधून आलेले काही अतिरेकी या भागातही लपले असल्याचा यंत्रणेचा संशय आहे.