सिमला (मध्य प्रदेश)- कल्का-सिमला रेल्वेमार्गावर धावणारी टॉय ट्रेन आज (शनिवार) दुपारी कोसळल्याने दोन विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
यासंदर्भात उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी निरज शर्मा यांनी सांगितले, की टकसल रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. एका वळणावर चारपैकी तीन डबे मार्गावरुन घसरले. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना कल्का हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना चंदिगडच्या मॅक्स रुग्णलयात हलविले जाणार आहे. दोन प्रवाशांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
IRCTC च्या माध्यमातून या टॉय ट्रेनचे बुकिंग करण्यात आले होते. खास विदेशी पर्यटकांसाठी ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे आणखी फोटो....