आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toyaba Terrorist Returned After Blast In Jammutavi Express

जम्मूतावी-एक्स्प्रेस उडवून पाकला परतणार होते 'तोयबा'चे अतिरेकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईच्या निधनाचे दु:ख : आईच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलीला धीर देताना नातेवाईक. पोलिस ठाण्यानजीकच्या रुग्णालयात उपचार घेत असलेली आई निर्मला देवी यांनी अतिरेक्यांची गोळी लागल्यानंतर प्राण सोडले. - Divya Marathi
आईच्या निधनाचे दु:ख : आईच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलीला धीर देताना नातेवाईक. पोलिस ठाण्यानजीकच्या रुग्णालयात उपचार घेत असलेली आई निर्मला देवी यांनी अतिरेक्यांची गोळी लागल्यानंतर प्राण सोडले.
फिरोजपूर/चंदिगड - अतिरेक्यांच्या निशाण्यावर जम्मूतावी-भटिंडा एक्स्प्रेस होती. ही रेल्वे जम्मूहून रात्री ९.३० वाजता निघाल्यानंतर अतिरेक्यांनी पेरलेल्या बॉम्बच्या रुळावरून गेली होती. पहाटे चार वाजता रेल्वे हे ठिकाण पार करणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव आठवड्यापूर्वी रेल्वेचा मार्ग जालंधरकडून वळवला होता. या रेल्वेला लक्ष्य करण्याचा थेट उद्देश लष्करी जवान आणि अधिका-यांवर निशाणा साधणे हा हाेता.

या गाडीतून जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत जवान व अधिकारी प्रवास करतात. याशिवाय जम्मूहून पठाणकोट, गुरुदासपूर,अमृतसर, जालंधर, फिरोजपूर ते बठिंडा जंक्शनवर थांबणारी ही एकमेव रेल्वे आहे. रेल्वे या रुळावरून गेली नाही त्यामुळे अतिरेक्यांनी ऐनवेळी रणनीती बदलून दिनानगर पोलिस ठाण्याकडे गेले. पहाटे ५.३० वाजता त्यांनी ठाण्यावर हल्ला केला. पूल उडवल्यानंतर रेल्वे नदीत पडली असती तर अतिरेक्यांनी त्यावर ग्रेनेड हल्ला केला असता.

दहशत | गोळीबारांच्या आवाजाने जाग
दिनानगर पोलिस ठाण्यातील गोळीबारामुळेच लोकांना जाग आली. ठाण्याजवळ राहणारे जतिंदर कुमार म्हणाले, 'आधी काही वेळ गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर आधी पोलिस व नंतर लष्कराची वाहने त्यादिशेने जाताना दिसली.' वीरेंद्र कुमारने सांगितले की, दिनानगरमध्ये प्रथमच अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला पाहिला आहे. संपूर्ण गाव दहशतीखाली असून लोक घराबाहेर निघण्यासही घाबरत आहेत.

प्रत्येक ५ मिनिटांत गोळीबार करत राहिले : हल्ल्यात जखमी एका पोलिस अधिका-याने सांगितल्याप्रमाणे हल्लेखोरांत एक महिलाही होती. ते म्हणाले, 'आम्ही काही समजायच्या आतच ते थेट ठाण्यात घुसले आणि गोळीबार सुरू केला. त्यांनी लष्कराचा गणवेश घातला होता आणि दर पाच मिनिटांनी गोळीबार करत होते. हल्लेखोरात एक महिलाही होती. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच आम्ही हाती शस्त्रे घेण्यासाठी सरसावलो. तेवढ्यात एक गोळी माझ्या कानाला चाटून गेली. मी मान वळवून पाहिले तर गोळी माझ्या खांद्याला लागलेली दिसली. माझ्या खांद्यातून रक्त वाहत होते.'

१९९५ नंतर पंजाबमध्ये पहिल्यांदाच असा हल्ला
अजय साहनी (इंडियन इन्स्टिट्यूट फॉर कन्फ्लिक्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक) यांनी सांगितले की, १९९५ नंतर पंजाबमध्ये अशाप्रकारचा हल्ला झालेला नाही. हा हल्ला काश्मीरमधील लष्कर ए तोयबाच्या हल्ल्यांच्या धर्तीवर आहे. खालिस्तानी समर्थक दहशतवाद्यांचा इतिहास फिदायीन हल्ल्याचा नाही. मात्र, खलिस्तानचे अनेक नेते आताही पाकिस्तानात राहत आहेत. कदाचित हा हल्ला घडवून आणण्यासाठी स्थानिक दहशतवाद्यांची मदत घेण्यात आली असावी. पाकिस्तानची आयएसआय भारतात खलिस्तान आंदोलने पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. कदाचित काश्मीरमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था असल्याने आणि तेथे संधी न मिळाल्याने पंजाबला सॉफ्ट टार्गेटच्या रुपात निवडले असावे.

दहशतवादामध्ये राजकारण
एकीकडे गुरुदासपूरमध्ये सुरक्षा दल अतिरेक्यांशी लढत होते, तर दुसरीकडे संसदेत राजकारण सुरू होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे, सपा, राजद, जदयू आणि टीआरएसच्या खासदारांनी गोंधळ घातला. गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी संसदेत निवेदन करणार आहेत.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरुवातीस संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. दोन वेळच्या तहकुबीनंतर २.०० वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश असल्याचे सांगण्यात आले. यावर एम.व्यंकय्या नायडू म्हणाले, या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य नाही.

बादल बिथरले, केंद्राकडे बोट
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल म्हणाले, गुप्तहेर विभागाने पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याविषयी इशारा दिला होता. असे असताना केंद्राने वेळीच राज्य सरकारला सतर्क का केले नाही ? दहशतवाद्यांना का घुसखोरी करू दिली. घुसखोरी रोखणे केंद्राचे काम आहे, असे बादल म्हणाले.

राजनाथ यांच्यावर मोदी नाराज
पंतप्रधान मोदी यांनी हल्ल्याबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात संरक्षण मंत्री पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह एनएसएचे अजित डोभाल उपस्थित होते. परंतु राजनाथ सीआरपीएफच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशला रवाना झाले होते. त्यावरून मोदी नाराज होते.

भविष्य वाचवण्याची धडपड
पोलिस स्टेशनजवळील एका रुग्णालयात नवजात शिशू व त्याच्या आईला सुरक्षित ठिकाणी नेताना सुरक्षा रक्षक. यानंतर त्यांना दुस-या रुग्णालयात नेण्यात आले.
पुढे वाचा... 20 वर्षानंतर पंजाबात दहशतवादी हल्ला...