आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Rules Break To Police In Ranchi. News In Marathi.

PHOTOS: धोनीकडून दंड वसूल करणारे पोलिसच करताहेत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मेन रोडवर खुलेआम वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणारा पोलिस कॉन्स्टेबल)
रांची- झारखंडची राजधानी रांचीमध्ये दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. धोनीने आपल्या बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 450 रुपये दंडही वसूल केला. मात्र, दंड वसुल करणार्‍या पोलिसांकडूनच खुलेआम वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे.
रांची शहरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी पोलिस कर्मचारी विना हेल्मेट दुचाकीवरून फिरताना ‍दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पोलिसाच्या दुचाकीवर नंबर प्‍लेटवर रजिस्‍ट्रेशन क्रमांक नव्हता तर 'पोलिस' असे लिहिले होते. धोनीच्या बुलेटचा रजिस्ट्रेशन क्रमांक मडगार्डवर लिहिला होता. त्यामुळे त्याच्याकडून 450 रुपये दंड वसूल करण्यात आला.
धोनीकडून आकारला 450 रुपये दंड
धोनी सोमवारी (6 एप्रिल) शहरातून आपल्या बुलेटवरून फेरफटका मारताना दिसला होता. बुलेटच्या मडगार्डवर वाहन क्रमांक लिहिला होता. परंतु, धोनीपर्यंत वाहतूक पोलिसांची नजर पोहोचली नाही. मंगळवारी (7 एप्रिल) वृत्तपत्रात धोनीचे बुलेटवरील छायाचित्रे प्रसिद्ध झाले. धोनीच्या बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्याचे आढळून आले. वाहतुकीच्या नियमानुसार गाडीची नंबर प्लेट समोरच्या बाजूला असणे आवश्यक आहे. त्यामुळे धोनीवर दंडात्मक कारवाई करण्‍यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. धोनीच्या घरी दंडाची पावती पाठवून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल केली. परंतु, बुधवारी अनेक पोलिस कर्मचारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले. यावेळी फक्त एका पोलिसाकडून दंड वसूल करण्यात आला.
धोनीकडून दंड वसूल करणारे वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सिंह यांनी (जगन्नाथपूर पोलिस स्टेशन) सांगितले की, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशातुसार ही कारवाई करण्‍यात आली. धोनीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, खुलेआम वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे पोलिस ..

(फोटोग्राफर: रमीज/वसीम)