आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात दोन्ही पाय कटल्याने रुळावर तडफडत होती तरुणी, रेल्वे गेल्यावर दिसले हे दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरिमा तिच्या 3 मैत्रिणींसह भोपाळला निघाली होती. - Divya Marathi
गरिमा तिच्या 3 मैत्रिणींसह भोपाळला निघाली होती.
इंदूर -  उज्जैनच्या मक्सी रेल्वेस्टेशनवर एका भीषण अपघातात रेल्वेखाली तरुणीचे दोन्ही पाय चिरडले गेले. पाय कटल्यावर याच गंभीर अवस्थेत बराच वेळ तरुणी रुळांदरम्यान तडफडत होती. यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला उज्जैनच्या रुग्णालयात पाठवले, येथून तिला उपचारांसाठी इंदूरला रेफर करण्यात आले होते. तरुणीच प्रकृती अजूनही गंभीर आहे.
 
धावत्या रेल्वेत चढण्याचा केला प्रयत्न
- प्राप्त माहितीनुसार, तराणा येथील रहिवासी गरिमा पवन तिवारी आपल्या 3 मैत्रिणींसह भोपाळला जात होती.
- मक्सी स्टेशनवर जेव्हा ते पोहोचले तेव्हा रेल्वे रवाना होणार होती. यामुळे गरिमाने मैत्रिणींना ट्रेनमध्ये सीट पकडण्यासाठी सांगितले आणि स्वत: तिकीट घ्यायला गेली.
- ती तिकीट घेऊन परतत होती तेव्हा तिची पर्स खाली पडली. ती पर्स उचलण्यासाठी वाकली तेवढ्यात रेल्वेही सुरू झाली. 
- रेल्वे जाताना पाहून गरिमा जोरात धावली आणि चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न तिने केला. परंतु तिचा पाय निसटला आणि ती रुळावर आदळली. रेल्वे तिला चिरडून पुढे गेली.
- या दुर्घटनेत गरिमाचे दोन्ही पाय कटून वेगळे झाले. रेल्वे निघून गेल्यावर ती रुळांवरच तडफडत होती. हे पाहून काही जणांनी धाव घेऊन तिला मदत केली. त्यांनी गरिमाला तिचे नाव आणि कुटुंबीयांचा मोबाइल नंबर विचारला.
- काही जणांनी टॅक्सी बोलावून रुग्णालयात नेण्याचाही प्रयत्न केला, परंतु टॅक्सीवाल्यांनी तिची अवस्था पाहून तिला न्यायला नकार दिला. यानंतर रेल्वे पोलिसांनी अॅम्ब्युलेन्स बोलावून तिला प्राथमिक उपचारांसाठी पाठवले, येथून तिला उज्जैन आणि तेथून इंदूरला रेफर करण्यात आले.
- घटनेची माहिती मिळताच तराणाचे आमदार अनिल फिरोजिया यांनी माधवनगर रुग्णालयात भेट घेतली. त्यांनी गरिमाची प्रकृती पाहून तिला इंदूरच्या खासगी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. सध्या आयसीयूमध्ये गरिमावर उपचार सुरू आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...