आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० कंटेनरची ट्रेन गायब, १८ दिवसांपासून पत्ताच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - ९० कंटेनर असलेली ट्रेन गायब झाली आहे. १८ दिवस झाले तरी या लांबलचक गाडीचा काहीच पत्ता लागलेला नाही, असे सांगितले तर कुणाला खरे वाटणार नाही. पण राजस्थानात हा धक्कादायक परंतु रंजक प्रकार घडला. या रेल्वेच्या प्रत्येक कंटेनरमध्ये १० लाख रुपयांचा माल होता. एकूण ९० कोटी रुपयांचा हा माल एक्स्पोर्ट होणार होता. ट्रेनचाच पत्ता नसल्याने रेल्वेचे सगळेच वेळापत्रक कोलमडले आहे.

ही मालगाडी २७ जुलै रोजी जोधपूरहून रवाना झाली होती. तीन दिवसांचा प्रवास करून ती मुंद्रा पोर्टवर पोहोचणार होती. परंतु अद्यापपर्यंत ती रेल्वे निर्धारित िठकाणी पोहोचलीच नाही. दोन ऑगस्ट रोजी ही ट्रेन अहमदाबादमध्ये असल्याचे ऑनलाइन स्टेटसहून दिसत आहे. परंतु आता ती तेथेदेखील नाही. माल आणि मालगाडी पोहोचली नाही असे लक्षात आल्यावर एक्स्पोर्टनी आरडओरड सुरू केली. तयाप्रकरणी जोधपूर येथील एक्स्पोर्टर रंजन कंसारा यांनी १४ जुलै रोजी कंटेनर बुक केले होते. २७ जुलै रोजी माल भरून ट्रेन रवाना केली होती. ३० जुलैला ही ट्रेन मुंद्रा बंदरात पोहोचणार होती. ती न आल्याने मी चौकशी सुरू केली. त्यानुसार असे समजले की, ट्रेन बंदरापर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर मी कॉनकोर डेपोमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी चौकशी केली असता दहा दिवसांपासून ट्रेनचे स्टेटस अहमदाबादलाच दाखवत होते. परंतु आता ही ट्रेन तेथेही नाही. डेपोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर ट्रेन शोधण्याचे काम सुरू झाले. जोधपूर येथील काॅनकोरचे टर्मिनल मॅनेजर पारस गोयल यांनी सांगितले की, पावसामुळे ट्रेन लेट असून ट्रे शोधण्यासाठी एका कर्मचाऱ्याला पाठवण्यात आले आहे. गंमत म्हणजे ५ ऑगस्टला जोधपूरहून रवाना झालेली दुसरी ट्रेन मुंद्रा पोर्टवर पोहोचली आहे.
परंतु त्याआधी रवाना झालेल्या या ट्रेनचा पत्ताच नाही.

ट्रेन कोण चालवत होते माहीत नाही
मालगाडीचे चालक दर बारा तासांनी बदलतात. बेपत्ता ट्रेन जोधपूरहून घेऊन जाणारा चालक परत आला आहे. त्याने दुसऱ्या िवभागातील चालकाच्या हाती मालगाडी सोपवली होती. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. कॉनकोर व्यवस्थापनाकडे दुसऱ्या विभागाच्या चालकांचा नंबरच नाही.