आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Train To Katara Stuck In Tunnel Due To Engine Failure, News In Marathi

कटरा जाणार्‍या रेल्वेच्या इंजिनात बिघाड; बोगद्यात अडकली श्री शक्ती एक्स्प्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी श्री शक्ती एक्स्प्रेस सुरु केली आहे. मात्र, शक्ती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज (बुधवार) सकाळी कटरा स्टेशनजवळ असलेल्या बोगद्यात तब्बल एक तास अडकून पडली. यामुळे गाडीत बसलेले प्रवाशी प्रचंड घाबरले होते. काही मुले आजारी पडल्याचीही माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वातानुकूलित सुपरफास्ट श्री शक्ती एक्स्प्रेस नवी दिल्लीहून कटरासाठी निघाली होती. या गाडीची ही दुसरी फेरी होती. मात्र, कटारा स्टेशनपासून पाच किलोमिटर अंतरावरच इंजिनमध्ये बिघाड झाला.
फिरोजपूर मंडळाचे रेल्वे प्रबंधक (डीआरएम) एनसी गोयल म्हणाले, कटरा हे नवे स्टेशन असल्याने येथे उधमपूर येथून इंजिन आणले आहे. शक्ती एक्स्प्रेसचा कटाला स्टेशनला पोहोचण्याचा निर्धारित वेळ सकाळी 5 वाजून 10 मिनिटे आहेत. परंतु, ही गाडी सकाळी सात वाजता कटरा येथे पोहोचली. फिरोजपूर मंडळाच्या अंतर्गतच जम्मू काश्मीर रेल्वे नेटवर्क आहे. गाडी 35 मिनिटे उशीराने धावत होती. त्यात गाडी तब्बल एक तास बोगद्यात अडकून पडल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. रेल्वे मार्ग तसेच बोगद्याची कोणती कोणतीही समस्या नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दुसरे इंजिन पाठवून रेल्वे पुढे सोडण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या रेल्वे गाडीला ग्रीन सिग्नल दाखवला होता.