आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानपूर रेल्वे अपघाताची फॉरेन्सिक चौकशी, मृतांचा आकडा 145

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / पुखरायन - कानपूरनजीकच्या पुखरायनमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची न्यायवैद्यक(फॉरेन्सिक) चौकशी होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी लोकसभेत ही घोषणा केली. दोषींची गय केली जाणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान व फॉरेन्सिक विश्लेषणाबरोबर प्रत्येक पैलूची चौकशी केली जाईल,असे प्रभू यांनी सांगितले. यासोबत रेल्वे सुरक्षा आयुक्तही स्वतंत्र चौकशी करतील.
दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४५ पर्यंत पोहोचला आहे. नुकसानग्रस्त डब्यांत प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. इंदूर- पाटणा एक्स्प्रेसचे सर्व १४ चेंदामेंदा झालेले डबे रुळावरून हलवण्यात आले आहेत.
आईच्या काठीमुळे वाचले ७ जण : या एक्स्प्रेसमध्ये वयोवृद्ध आईने कुटुंबातील सात जणांचा जीव वाचवला. हे कुटुंब मुजफ्फरपूरचे आहे. मनोज चौरसिया पाटण्याला येण्यासाठी कुटुंबासह इंदूरहून बसले होते. सर्व सदस्य बीएस १ डब्यात अडकले होते. दुर्घटनेत अडकलेल्या मनोज यांनी आईच्या काठीच्या मदतीने खिडकीच्या काचा फोडल्या आणि कुटुंबातील सदस्यांचा जीव वाचवला,अशी माहिती मनोज यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...