आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trainee Judges News In Marathi, Uttar Pradesh, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेशात अखेर अकरा प्रशिक्षणार्थी जज बडतर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात अकरा प्रशिक्षणार्थी जजना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांचे सर्व न्यायालयीन अधिकार गोठवण्यात आले आहेत. एखाद्या प्रकरणात एकाच वेळी इतक्या संख्येने जजवर बडतर्फीची कारवाई केली जाण्याची ही देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या सर्व जजवर दारू पिऊन सार्वजनिक िठकाणी महिलांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, सात सप्टेंबर रोजी न्यायाधीशाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे ज्युनियर जज फैजाबाद रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे दारू प्यायल्यानंतर ते आपसात भिडले. तेथे त्यांनी एकमेकांना मारहाण करत बारमध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. मारहाणीत एक जज बेशुद्ध पडला. तर अनेक जण रक्तबंबाळ होऊन प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. तेथे त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली. या प्रकाराची अलाहाबाद उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ११ ज्युनियर जजना न्यायिक कार्यातून मुक्त
करण्याचा निर्णय घेण्यात आला व तशी शिफारस राज्य सरकारला करण्यात आली.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्याला मंजुरी दिली आहे. सर्वांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.