आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर टान्फॉर्मर फुटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 14 वर, 7 जण हॉस्पिटलमध्ये दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - येथील विराटनगरमधील ढाणी गुजरान गावात ट्रान्सफॉर्मर फुटल्याने झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक लाहन मुलगा आणि 4 महिलांचा समावेश आहे. या घटनेमध्ये सुमारे 95 टक्के भाजलेल्या इतर 7 जणांना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सीएम वसुंधरा राजे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन चौकशी केली. केंद्रीय मंत्री राज्यवर्द्धन सिंह राठोड यांनीही हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली. 

लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते सासरचे लोक.. 
- ढाणी गुजरानच्या भैरूराम गुर्जर यांच्या दोन मुलींचे मंगळवारी लग्न होते. त्याच्या विधीसाठी सासरचे लोक आलेले होते. त्यांच्या स्वागतादरम्यानच हा प्रकार घडला. 
- राज्यवर्द्धन सिंह राठोड यांनी एसएमएस हॉस्पिटलमध्ये पोहचून जखमींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. 
- जखमींच्या उपचाराती संपूर्ण काळजी सरकार घेत आहे, तसेच मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण मदत केली जात असल्याचे राठोड यावेळी म्हणाले. 

कसा झाला अपघात.. 
पाहुण्यांचत्या स्वागतासाठी महिला गाणी म्हणत घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या मांडवामध्ये जात होत्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजुला असलेल्या थ्री फेड ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि काही क्षणांत त्याचा स्फोट झाला. ट्रान्सफॉर्मर फुटल्यामुळे उडालेले लोखंडाचे तुकडे आणि गरम तेलामुळे त्याठिकाणी उब्या असलेल्या महिला आणि मुलांसह इतर लोक गंभीर भाजले गेले. 

60 ते 95% भाजले... 
- पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर इतरांनी उपचारादरम्यान एसएमएस हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 
- गरम तेलापासून 60 ते 95% टक्के भाजलेले 7 जण सध्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. 

अलवरहून येणारी वरात रद्द... 
- अपघातानंतर लग्नघरातील आनंदाच्या वातावरणात भयाण शांतता पसरली. घरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. संपूर्ण गावात शोककळा पसरली. अलवर जिल्ह्याच्या प्रतापगडमधील चौसला गावातून वरातही आली नाही. 
- या घटनेमुळे संतप्त लोकांनी मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि 20 लाखांची नुकसान भरपाई आणि जखमींना 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याची आणि दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. 
- राज्य सरकारने विभागीय आयुक्त राजेश्वर सिंह यांना घटनेच्या तपासाची जबाबदारी सोपवली आहे. 
- जिल्हाधिकारी सिद्धार्थ महाजन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख आणि दोषी कर्मचाऱ्यांना कारवाईचे आश्वासन देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...