आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किन्नरचे वडील आहेत रिटायर्ड जनरल, एका चुकीमुळे आहे 17 वर्षांपासून अबोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - गेल्या 17 वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजधानीत राहाणाऱ्या एका किन्नरला आता समान्यांसारखे जीवन जगाययी इच्छा आहे. त्यासाठी तिने इग्नूमध्ये प्रवेश घेतला आहे. नाच-गाणे सोडून कुठेतरी जॉब करुन उदरनिर्वाह करण्याची तिची इच्छा आहे. किन्नर सूधासोबत DainikBhaskar.com ने बातचीत केली. सुधाने तिची स्टोरी यावेळी शेअर केली. 
 
असे कळाले नॉर्मल नाही सुधा 
- सुधा बिहारमधील सिवानची रहिवासी आहे. लखनऊमध्ये कशी पोहोचली हे सांगण्यापूर्वी सुधाने तिची बिहारची स्टोरी सांगितली. 
- सुधा म्हणाली, वडील अमरनाथ तिवारी हे लष्करात जनरल होते. आम्ही पाच भाऊ-बहिणी. तीन बहिणीत मी दोन नंबरची. आईचे आता निधन झाले आहे. दोन्ही भाऊ दिल्लीत जॉब करतात. बहिणींचे लग्न झाले आहे. 
- सुधा सांगत असेत, 'मी तेव्हा आठवीत होते. माझे क्लासमेट मला चिडवायचे. माझे बॉडी स्ट्रक्चर पाहून ते खिल्ली उडवायचे. मलाच एकटीला अपमानीत व्हावे लागत नव्हते तर माझ्यामुळे माझ्या कुटुंबालाही लोकांचे टोमणे ऐकवे लागत होते. - तुमची मुलगी किन्नर आहे, तिला शाळा काय शिकवता नाच-गाणे करायला पाठवा.'
- 'हे बोल ऐकल्यानंतर मी तासन् तास रडत राहायचे. भाऊ आणि वडील घरी असले की ते लोकांना सुनवायचे. त्यांच्याशी भांडणही करत होते. त्यांचा मला फार मोठा आधार होता. परंतू वाईट तर वाटत होते.' 
 
चार वर्षानंतर घेतला घर सोडण्याचा निर्णय 
- सुधाने सांगितले, की ती 14-15 वर्षांची असताना घरातून पळून लखनऊला आली. तेव्हा ती 10व्या वर्गात होती. 
- ती सांगते, 'माझे वय वाढत होते तसे लोकांचे टोमणेही वाढत होते. माझ्यामुळे कुटुंबाला का त्रास? असा विचार करुन मी 1999 ला लखनऊच्या रेल्वेत बसले.'
- 'लखनऊमधील चारबाग स्टेशनला मी उभी होते. काय करावे काहीच कळत नव्हते. मी एका ऑटो रिक्शावाल्याला शहरात किन्नरांची वस्ती कुठे ते विचारले. रिक्शावाल्याने मला सहादतगंजमध्ये सोडले. माझ्याकडे तेव्हा 100 रुपये होते. अशाप्रकारे मी किन्नरांच्या वस्तीत, त्या समाजात पोहोचले.'
- येथे माझी भेट अखाड्याची गुरु संध्यासोबत झाली. 
 
त्यानंतर वडिलांशी बोलणे झाले नाही... 
- सुधाला लखनऊमध्ये येऊन 17-18 वर्षे झाली. येथे अखाड्याची गुरु संध्याने तिला आपल्या सोबत ठेवल्याचे ती सांगते. संध्याने आई-वडीलांचे प्रेम दिले. यापुढेही तिच्यासोबतच राहाण्याची सुधाची इच्छा आहे. परंतू आता नाच-गाणे करायचे नाही तर नोकरी करण्याचा तिचा विचार आहे. 
- त्यासाठी सुधाने इग्नूमध्ये प्रवेश घेतला आहे. तिला रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे. त्यासाठी तिने इतिहास, जनरल नॉलेज याचा अभ्यास सुरु केला आहे. 
- जेव्हा सुधाला विचारले की आता कुटुंबियांशी कधी बोलणे होते का, त्यावर ती म्हणाली, 'वडील सोडून सर्वांशी बोलणे होते. आई आता या जगात नाही. मी घर सोडून गेल्याने वडील अजून नाराज आहेत.'