आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट व्हिसावर प्रवास; जर्मन नागरिकाला अटक; रेल्वे कर्मचाऱ्याशी वाद घातल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्याशी वाद झालेल्या जर्मन नागरिकाला बनावट व्हिसावर प्रवास करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.  

होल्जर एरिक मिश्च हा बर्लिनचा रहिवासी असून ३ नोव्हेंबरला त्याला रेल्वे कर्मचारी अमनकुमार यांच्याशी वाद झाला होता. एरिकने दोन पोलिसांवरही काठीने हल्ला केला, असा आरोप आहे. सोनभद्रचे पोलिस अधीक्षक आर. पी. सिंग यांनी वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून सांगितले की, एरिकला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे टुरिस्ट व्हिसा नाही आणि दुसरे म्हणजे त्याच्याकडे बनावट व्हिसा आहे.  

एरिकला ३ नोव्हेंबर रोजी मिर्झापूरमधील जीआरपी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. जीआरपीचे निरीक्षक समर बहादूर सिंग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलिसांच्या वाहनातून उतरल्यानंतर एरिकने उपनिरीक्षक हरिकेश राम आझाद आणि मिथिलेश यादव यांना काठीने मारहाण केली. तो विदेशी पर्यटक असल्याने आणि आपला अतिथी असल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नाही, असा निर्णय घेतला.  

एरिकवर ५ जुलै रोजी हिमाचल प्रदेशमधील कुलू येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे त्याने एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा कुलू येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जमा आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...