अहमदाबाद- गुजरातमध्ये सौराष्ट्र येथील असामान्य प्रमाणात स्थूल असलेल्या तीन सुमो मुलांवर अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सौराष्ट्रच्या नंदवाला कुटुंबातील सुमो भाऊ - बहिणीच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
डॉ.चारुल पुराणी यांनी सांगितले, की या उपचारांत केंब्रिज विद्यापीठातील स्थूलतेचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.एम. प्रभाकर यांनी सांगितले की, तिन्ही मुले लठ्ठपणाचे शिकार आहेत. प्राथमिक तपासात त्यांच्या नेमक्या आजाराचे निदान झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या गुणसूत्रांचे विश्लेषण केले जात आहे.
मुलांचे वडील रमेश नंदवाला जुनागड जिल्ह्यातील वाजडी गावचे रहिवासी आहेत. त्यांना तीन मुली एक मुलगा आहेत. पैकी मोठी मुलगी आठ वर्षीय भाविकाची वाढ सामान्य आहे. पण पाच वर्षाची योगिता, चार वर्षांची अमीषा दीड वर्षाचा हर्ष यांचे वजन खूपच जास्त आहे. त्यांच्या पालकांनी याबाबत राज्य सरकारला मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुलांच्या उपचारासाठी मदतीचे आदेश दिले आहेत.
कुटुंबियांना विकावे लागले दागिने...गुजरातमधील हे लहान 'सुमो' तीन ते पाच वर्षांच्या आतील आहेत. यांना सगळ्यांना सांभाळसाठी कुटुंबाला दागिने विकावे लागले. यांचे पिता रमेशभाई मोलमजुरी करतात. मुले सामान्य व्हावीत म्हणून बरेच उपचार केले, पण फरक नाही पडला.
*याेगिता - अमिषा : किलो टरबूज, एक लिटर दूध 10 चपात्या.
हर्षचा आहार
हा एकदा जेवायला लागला तर कशालाच नकार देत नाही. प्रकृतीचा विचार करून घरच्यांनाच पुरे कर, असे म्हणून थाळी त्याच्यापुढून काढून घ्यावी लागते.
मुलांचे वजन आहार
हर्ष: 1.5वर्षे, वजन 15 किलो.
अमिषा: वर्षे,वजन 45 किलो.
योगिता: वर्षे,वजन 45 किलो.