आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: 118 मनोरुग्णांना शाेधून उपचार केल्यानंतर कुटुंबीयांची घडवली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- राजू या मनोरुग्ण आहेत. अहमदाबादेत राहतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी, पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. परंतु त्या सापडल्या नव्हत्या. त्या मरण पावल्या असाव्यात असे त्यांच्या मुलांनाही वाटत होते.  

एके दिवशी त्यांना बगोदरा येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार संस्थेच्या बाबतीत समजले. मुले आईला शोधण्यासाठी तेथे पाेहोचली. शेकडो मानसिक रुग्णांमध्ये आईला शोधत असताना अचानक एका खोलीत त्यांची नजर गेली. आई समोरच बसलेली होती.  

आईने त्यांना पाहताक्षणी ओळखले. परंतु आता त्यांनाही फार काही आठवत नव्हते. या संस्थेचे दिनेश लाठिया गेल्या तीन वर्षांपासून अशा ११८ मनोरुग्णांवर उपचार करून त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांची  भेट घडवत आहेत.  
बातम्या आणखी आहेत...