आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात भूकंपाचे धक्के, 5.7 रिश्टर स्केलची नोंद, गुवाहाटी, आसाम आणि मेघालयातही जाणवले धक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा- त्रिपुरात मंगळवारी दुपारनंतर २. ३९ वाजता भूकंपाचे झटके बसले. जवळपास दीड मिनिटापर्यंत हे भूकंपाचे झटके जाणवले. या झटक्यांची भूकंप मापन यंत्रावर ५. ७ रिश्टर स्केल एव्हढी नोंद झाली आहे. या धक्क्यामुळे एका महिलेचा हृदयविकाराचा झटका येऊन प्राण गेला. या भूकंपामुळे विविध घटनांत चार जण जखमी झाले. 

विझान केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र ढलाई जिल्ह्यातील जमिनिपासून २८ किलोमीटर खाली होते. येथे जवळपास ३० घरे पडली. लोकप्रतिनिधी अर्जून दास यांनी सांगितले की घाबरुन लोक घरे व दुकानांतून बाहेर आले. आगरतळ्यापासून ५९ कीलोमीटर दूर अंबासामध्येही हा धक्का जाणवला. छमनु-गोविंदबारी रस्त्याच्या काही भागाची जमीन खचली. गुवाहाटी, आसाम आणि मेघालयातही हे भूकंपाचे धक्के जाणवले.
 
 
बातम्या आणखी आहेत...