आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 टक्के आदिवासींच्या 26 जागांवर आजवर कोणत्याही पक्षाची एकाधिकारशाही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि २२ वर्षांपासून गुजरातमध्ये राजकीय वनवास भोगणाऱ्या काँग्रेससाठी यंदाची गुजरात विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. विशेषत: गुजरातमधील आरक्षित जागांवर दोन्ही पक्षांनी दमदार दावा ठोकला आहे. 


एकेकाळी काँग्रेसचा प्रमुख मतदारवर्ग राहिलेला अनुसूचित जाती, जमातींचे मतदार मागील २७ वर्षांमध्ये विखुरले गेले आहेत. यामुळेच या जागांवर भाजप पूर्वीपेक्षा जास्त मजबूत स्थितीत दिसत आहे. २०१२ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तम प्रदर्शन केले होते. मात्र २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा दमदार पुनरागमन करत राज्यातील तिन्ही आदिवासी जागा ताब्यात घेतल्या. काँग्रेस आता पुन्हा आपल्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. 


त्यांनी चार जागांवर छोटू वसावा यांच्या आदिवासी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. तसेच ओबीसी आणि एससी मते मिळवण्यासाठी दलित नेते जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर यांनाही सोबत घेतले आहे. आदिवासीबहुल वसवाड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर सभा घेऊन आदिवासी जोडण्याचा प्रयत्न केला.

 

१९९० मध्ये जनता दल तर २०१२ मध्ये काँग्रेस अव्वल 
 गुजरातमधील आदिवासीबहुल मतदारसंघांचा  विचार करता १९९० मध्ये आरक्षित २६ जागांपैकी सर्वाधिक ११ जागा जनता दलाकडे होत्या. भाजपकडे ६, काँग्रेसकडे ७ आणि अपक्षांकडे २ जागा होत्या. राममंदिर आंदोलनानंतर १९९५ मधील निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १४, तर काँग्रेसच्या खात्यात ८ जागाच आल्या. झगडिया येथील जागा छोटूभाई वसावा यांनी जिंकली होती. त्यानंतर २०१२ मध्ये काँग्रेसने १५ जागांवर ताबा मिळवला. तर भाजपकडे १० जागा आल्या. झगडियाची जागा वसावांकडेच राहिली. 

 

द. गुजरातमध्ये सर्वाधिक आदिवासी जागा 
गुजरात राज्यात दक्षिण गुजरातमध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आणि विधानसभेच्या जागा आहेत. २६ जागांपैकी येथे १७ जागा आहेत. त्यातही ८ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता, तर उर्वरित ७ जागांवर भाजप विजयी झाला होता. झगडियाची जागा छोटू वसावांकडे आहे. मागील लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली होती. 

 

काँग्रेसचा गावोगाव जाऊन जनसंपर्क 
दक्षिण गुजरातचे आदिवासी नेते आणि वलसाडचे काँग्रेस जिल्हा प्रमुख किशनभाई पटेल यांच्या मते, आदिवासी मागील काही वर्षांपासून भाजपच्या आश्वासनांना भुलले होते. काँग्रेस गावोगाव जाऊन भाजपा सरकारच्या दाव्यांमधील सत्य नागरिकांना दाखवून देत आहे. जंगलातील जमीन देणे, रोजगार अथवा वन बंधू योजनेत भाजपने आदिवासींवर अन्याय केल्याचे काँग्रेस सांगत आहे. आदिवासी काँग्रेसला पाठिंबा देतील, असा अंदाज वर्तवला जाताेय.

 

एक वर्षापासूनच भाजप सक्रिय 
मागील काही वर्षांत वलसाड, नवसारी, डांग आणि भरूचसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रांत सरकार पोहोचू शकले नाही तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे काम केले आहे. संघाच्या मदतीने केंद्र सरकार डांगमध्ये सैनिकी शाळा सुरू करणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये संघप्रमुख मोहन भागवत यांनी वांसदा येथे सभा घेतली होती. २०१७ मध्येही भाजप सरकारने आदिवासी गौरव यात्रा काढून आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, एसटी जागांचा ट्रेंड...

बातम्या आणखी आहेत...