आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribal Girl Gang Raped On Khap Orders In West Bengal

प. बंगालमध्ये पंचायतीच्या आदेशावरून 13 लोकांनी केला 20 वर्षीय मुलीवर गॅंगरेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरी (पश्चिम बंगाल)- बिरभूमी जिल्ह्यात गावातील 13 लोकांनी 20 वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घडना घडली आहे. विशेष म्हणजे गावाच्या पंचायतीने अशा स्वरुपाचे दुष्कर्म करण्याचा आदेश या 13 लोकांना दिला होता. शांतिनिकेतनपासून केवळ 25 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या लाभपूर पोलिस ठाण्याच्या हद्दितील सुबलपूर या गावात ही घटना घडली आहे.
या मुलीचे दुसऱ्या गावातील एका मुलावर प्रेम होते. यावर गावातील लोकांनी आक्षेप घेतला. त्यावर निर्णय देताना गावातील पंचायतीने मुलीला गंभीर शिक्षा सुनावली. तिचे प्रेम असलेल्या मुलाला रात्रभर कैद ठेऊन 25 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर मुलाला सोडून दिले. परंतु, त्यानंतर मुलीला बजावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. गावातील 13 लोकांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी 11 आरोपींना पकडले आहे. यात पंचायतीच्या मुखियाचाही समावेश आहे. या मुखियाच्या आग्रहावरच पंचायतीने हा निर्णय सुनावला होता, असे समजते.
पीडित मुलीच्या आईने सांगितली आपबिती....
पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची देखभाल करणाऱ्या तिच्या आईने सांगितले, की माझ्या मुलीची एका दुसऱ्या गावातील मुलासोबत ओळख होती. सोमवारी तो मुलगा माझ्या घरी आला होता. तेव्हा गावातील लोकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील लोकांनी मुलाला पकडले. त्याला रात्रभर एका घरात कैद करून ठेवले. त्यानंतर गावातील लोक माझ्या मुलीला घेऊन गेले. त्यांनी सांगितले, की मुलीसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे माझे पती आणि 15 वर्षांचा मुलगा मुलीसोबत गेले. त्यानंतर लोकांनी मुलीला आणि मुलाला एका झाडाला बांधले. यावेळी पंचायतीने कबिल्याचा नियम मोडल्याचा आरोप दोघांवर लावला. दोघांनी प्रत्येकी 25 हजार रुपये भरण्याचे फर्मान सोडले.
एवढे करून पंचायतीचे समाधान झाले नाही. त्यांनी माझ्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर माझ्या मुलीला गावातील एका घरात घेऊन गेले. तेथे गावातील लोकांनी आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला. बलात्कार करणाऱ्या लोकांपैकी 13 जणांना मुलीने ओळखले आहे.