आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSF चा दावा - हाफिज सईद दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी देत आहे चिथावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दावा केला आहे, की दहशतवादी हाफिज सईद बॉर्डर परिसरात दहशतवादी छावण्यांचा दौरा करत आहे. तो भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना वारंवार चिथावणी देत आहे. बीएसएफने आरोप केला आहे, की मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदच्या या अभियानात पाकिस्तान सुरक्षा यंत्रणाही त्याला साथ देत आहे.
काय म्हणाले बीएसएफ
बीएसएफचे जम्मू सीमांत क्षेत्राचे आयजी राकेश शर्मा यांनी गुरुवारी पत्रकारांशी बातचित केली. ते म्हणाले, पाकिस्तान लष्कर हाफिज सईदला उघड-उघड पाठिंबा देत आहे. सईद पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांमध्ये फिरून त्यांना भारताविरोधात भडकवण्याचे काम करत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात शर्मा म्हणाले, सीमेपलिकडे दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. चिथावणीखोर वक्तव्ये वाढली आहेत.

30 दहशतवाद्यांना आयएसआयने आणले सीमेजवळ
दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर भागात हल्ला करण्यासाठी आयएसआयने 30 दहशतवाद्यांना पीओकेवर आणले आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिदीन आणि जैश-ए.मुहम्मद या दहशतवादी हल्ल्यांचा समावेश आहे. हे दहशतवादी पेशावरहून आणले गेले आहेत आणि त्यांना भारतीय सीमेलगत ठेवण्यात आले आहे.