कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नुकतेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. सर्वच्या सर्व 7 महापालिकांवर तृणमूलने विजयी पताका रोवली. तसेच सर्वात मोठा विरोधक भाजपला सपशेल पराभूत केले. एवढेच नव्हे, तर हल्दिया येथे तृणमूलचे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
- पश्चिम बंगालच्या 7 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 13 ऑगस्ट रोजी मतदान पार पडले. त्याचेच निकाल जाहीर झाले आहेत. यात तृणमूलने सर्वांचा पराभव केला.
- हल्दिया येथे टीएमसीचा ऐतिहासिक विजय झाला. या ठिकाणी सर्वच जागा तृणमूलला मिळाल्या आहेत. या व्यतिरिक्त नादिया येथील महापालिकेच्या सर्व 12 जागासुद्धा सत्ताधारी पक्षाने काबिज केल्या आहेत. बीरभूम येथे 16 पैकी 14 जागांवर टीएमसीचे उमेदवारच निवडून आले आहेत.