आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाला चापट मारली, बदला घेण्यासाठी मुलांनी केले 3 खून; पतीचा मृतदेह पाहून पत्नी बेशुद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्षुल्लक कारणावरून भांडण झाले अन् तिहेरी खुनाचे प्रकरण घडले. - Divya Marathi
क्षुल्लक कारणावरून भांडण झाले अन् तिहेरी खुनाचे प्रकरण घडले.
भिंड (ग्वाल्हेर) - शहराच्या चिलोंगा गावात तिहेरी खुनाची घटना घडली. याची सुरुवात दीपावलीच्या शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता क्षुल्लक भांडणावरून झाली होती. या भांडणात एका गटाने दुसऱ्या गटाच्या वृद्धाला थापडा मारल्या. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध कम्प्लेंट करायला सुरपुरा पोलिसांत गेले. पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत घातली आणि कारवाई न करता सोडून दिले, पण प्रकरण तिथेच थांबले नाही. एक गट भयंकर घटनेच्या तयारीत होता. त्यांनी दुसऱ्या गटाच्या लोकांवर गोळीबार सुरू केला. यात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पतीचा मृतदेह पाहून एक महिला बेशुद्ध झाली. या घटनेनंतर पूर्ण गावात अजूनही दहशतीचा माहौल आहे.
 
काय आहे प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, देवेश सिंह भदौरिया आणि राजू सिंह भदौरिया यांच्यात जुना जमिनी विवाद सुरू आहे. 
- गुरुवारी सकाळी 6.30 वाजता दोन्ही गटांत एका कारणावरून भांडण सुरू झाले.
- या भांडणात देवेश आणि सुरेश यांनी राजू सिंह यांना थापड मारली.
- यावर दोन्ही गट आपापल्या तक्रारी घेऊन पोलिसांगत गेले.
- पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवतील तितक्यात गावातील इतर लोकही आले.
- मग दोन्ही गटांना समजावण्यावर चर्चा झाली. यावर दोन्ही गट शांत होण्यास तयार झाले.
 
बापाच्या थापडीचा बदला घेण्यासाठी केले खून
- राजीखुशी प्रकरण मिटवण्याचे राजू सिंहच्या मुलांना आवडले नाही. त्यांनी बापाला थापड मारल्याचा बदला घेण्यासाठी छोटे सिंह, छोटू, वीरपाल, अजयपाल आणि देवेंद्र सिंह ऊर्फ मुल्लासहित तीन जणांनी सकाळी 9.30 वाजता बिजौरा कालव्याच्या पुलावर पोलिसांत परत येणाऱ्या सुरेश, बृजेश, देवेश आणि उपेंद्रवर बंदूक आणि देशी कट्ट्यांतून गोळीबार सुरू केला. यात बृजेश, सुरेश आणि देवेशचा जागेवरच मृत्यू झाला.
- उपेंद्रने तेथून पळून जाऊन स्वत:चा जीव वाचवला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...